शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांविना हाजराफॉल परिसर पडला ओसाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात आले. त्यामुळे या युवकांचा रोजगार हिरावला व उपासमारीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देएडवेंचर स्पोर्ट साहित्य धूळखात : नयनरम्य धबधब्याला पर्यटकांची वाट

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यातील सर्वात मोठा आकर्षक व नयनरम्य धबधबा सध्या दुधाची धार ओलांडत असून परम रोमहर्षक वाटत आहे. परंतु पर्यटन स्थळ बंद असल्याने एकीकडे हौशी पर्यटकांना याचा आनंद लुटता येत नाही. तर दुसरीकडे हाजराफॉल परिसरात काम करणारे युवक-युवती बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.नैसर्गिक पर्यटन स्थळ असलेल्या हाजराफॉल परिसरात नैसर्गिक धबधब्यासह मुलांसाठी एडवेंचर स्पोर्ट आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठीही मनोरंजनाची विविध साधने स्थापित करण्यात आली आहेत. तसेच विविध प्रकारच्या खाद्य पदार्थ आणि व्यंजनांची सुविधा आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना हाजराफॉलचा आनंद लुटण्यासह विविध प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तुंचा स्वादही चाखता येतो. पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात आले. त्यामुळे या युवकांचा रोजगार हिरावला व उपासमारीचे संकट ओढवले आहे.सप्टेंबर महिन्यात हाजराफॉल धबधबा सर्वात जास्त आल्हाददायक स्वरुपात असून उंच पहाडावरुन पडणारे पाणी दूधासारखा स्वच्छ श्वेत दिसून येते. परंतु या विहंमग दृष्याचे साक्षीदार बनन्यासाठी येथे पर्यटक नसून सर्व ओसाड दिसून येत आहे. स्टॉलच्या झोपडया आपोआप ध्वस्त होऊ लागल्या आहेत. खेळांचे साहित्य किलबिल करणाऱ्या मुलांची प्रतीक्षा करीत आहेत. धबधब्यातून उडणारे रोमहर्षक पाण्याचे तुषार पर्यटकांना मऊ स्पर्श दिल्याविनाच हवेत विरघळत आहेत. मागील ७ महिन्यांपासून सर्व परिसरात शुकशुकाट आहे. या मधात पक्ष्यांचा आरव आणि प्राण्यांचा चित्कार अवश्य ऐकायला मिळतो. त्यावर धबधब्याचा मंजुळ तान ऐकणारा मनुष्य प्राणी मात्र नदारत दिसतो. मागील ६ वर्षांपासून वैभवात वाढ झालेला हाजराफॉल पूर्वपदावर केव्हा येईल याची वाट बघावी लागणार आहे.आंबट शौकीनांचा जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्नशासनाने आतापर्यंत पर्यटन स्थळ सुरु करण्याचे आदेश दिले नाही. त्यामुळे हाजराफॉल सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. परंतु काही आंबट शौकीन युवक या परिसरात जबरदस्ती शिरण्याचा प्रयत्न करतात. वरच्या भागाकडून किंवा बोगद्याकडून हाजराफॉल पहाडावर चढण्याचा प्रयत्न करतात. परंतु समितीचे काही युवक त्यांना सतत थांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यात काही युवक वाद घालतात.‘पर्यटन स्थळ उघडल्यास कोरोना संकट वाढेल. कारण की येथे येणारे पर्यटक बेलगाम राहून कसेही वागतात. जास्तीतजास्त लोक मित्रमंडळी, सहकुटुंब किंवा जोड्याने येतात. तसेच या स्थळात नेहमी गर्दी होते. अशात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची सारखी शक्यता आहे.-अभिजीत इलमकर, वनपरिक्षेत्राधिकारी, सालेकसा

टॅग्स :Hajara Fallहाजराफॉलtourismपर्यटन