शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
5
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
6
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
7
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
8
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
9
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
10
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
11
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
12
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
13
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
14
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
15
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
16
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
17
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
18
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
19
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
20
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी

पावसाचा कहर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 21:48 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्देसडक-अर्जुनी तालुक्याला झोडपले : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंतिम टप्यात असताना मात्र जिल्ह्यात पाऊस चांगलाच खूश दिसून येत असून पहाटे ३ वाजतापासून बरसलेल्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्यात कहर केला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी, बोथली व म्हसवानी येथे पावसाने पाणी लोकांच्या घरात शिरल्याने तेथे जनजीवन विस्कळीत झाले. तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्यातील दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीची कामेही आटोपली शिवाय प्रकल्पांनाही चांगले पाणी आले. यामुळेच जिल्ह्यातील पाण्याची समस्या सुटल्याचे दिसत होते. त्यात मात्र रविवारी (दि.१) रात्री व सोमवारी (दि.२) सकाळी बरसलेल्या पावसामुळे जिल्हा आणखीच पाणीदार झाला आहे. पहाटे ४३ वाजतापासून सुरू झालेल्या पावसाने सडक-अर्जुनी तालुक्याला पार झोडपून काढले असून चांगलाच कहर केला आहे. तालुक्यातील खजरी, बोथली व म्हसवानी या गावात लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. शिवाय, गावात पाणी साचून असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना पाण्यातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने काही घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याबरोबर अन्न, धान्य व कपडयांची नासधूस झाली आहे. मातीच्या घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे दिसत आहे. शेत शिवारात पाण्याचा तडाखा जास्त असल्याने शेतीची नासधूस झाली आहे. गेल्या १० वर्षांत कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला नाही, असे म्हसवानी गावातील नागरिक सांगत आहेत.घटनेची माहिती मिळताच डव्वा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परसुरामकर यांनी म्हसवानी, बोथली, खजरी, डव्वा व घोटी परिसरात भेट देऊन पाहणी केली व तहसीलदारांना माहिती दिली.त्याचप्रकारे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातही चांगला पाऊस बरसला असून केशोरी मंडळात ६५.२० मीमी पाऊस बरसला असल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ८२५.३४ मीमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.इटियाडोह धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यताअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणात दुपारी १२.३० वाजतापर्यंत ९९.८० टक्के पाणीसाठा झाल्याने सायंकाळ ते रात्रीपर्यंत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. यामुळे गाढवी नदीत पाण्याची पातळी वाढून सुरबंध, बोंडगाव, चीचोली, कऱ्हांडली, खोकरी, दिनकरनगर, पुष्पनगर (अ) व (ब), जरूघाटा, वडेगावबंध्या, सावरी, बोरी व खोळदा ही गावे प्रभावीत होऊ शकत असल्याने त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आला आहे.तीन दिवस अतिवृष्टीचा इशाराजिल्ह्यात रविवारी (दि.१) पावसाने दमदार हजेरी लावून झोेडपले असतानाच आता सोमवारी, मंगळवारी व बुधवारीही अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशात प्रकल्पांची दारे उघडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने मासेमार, डोंगा वाहतूक करणारे शिवाय भुजली विसर्जन करणाऱ्यांना नदीत उतरू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच नदीकनारपट्टीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

कुरखेडा बस अडकलीअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. यामुळे केशोरीपासून ५ किमी. अंतरावर असलेल्या धोबी नाल्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असल्याने साकोली- कुरखेडा बस अडकली होती व तीन ते चार गावांचा संपर्क तुटला होता. पाण्यामुळे गावातील लोकांना बाजार करण्यासाठी केशोरी येथे जाता आले नाही. शिवाय या मार्गावरून गडचिरोली जिल्ह्याचा मार्ग ही बंद होता.

 

टॅग्स :Rainपाऊस