शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकराज संपण्यापूर्वी बदल्या मार्गी लावण्याची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा कालावधी लोटूनही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्यावर कुठलीच कारवाई सुद्धा करण्यात आली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  आधी कोरोना आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळपास दोन वर्ष लांबणीवर गेल्या. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. १० मे रोजी जि. प. अध्यक्षाची निवड केली जाणार असल्याने प्रशासकराज संपुष्टात येणार आहे. पण त्यापूर्वीच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची लगीन घाई जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांचा कार्यक्रम सामान्य प्रशासन विभागाने घोषित केला आहे. जिल्हा परिषदेत १० मे रोजी सत्ता स्थापन होणार असून ५ ते १५ मे दरम्यान बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे बदल्यांमध्ये पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नसणार आहे. राज्य शासनाच्या १५ मे २०१४ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेत कार्यरत गट क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या ५ ते १५ मे या कालावधीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत गट क आणि ड मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जाहीर केला आहे.  

बदलीनंतरही कर्मचारी एकाच ठिकाणी 

- जिल्हा परिषदेत दरवर्षी बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र बदलीनंतरही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू होत नाही. जि. प. मध्ये सन २०१८ मध्ये लेखा व बांधकाम आणि शिक्षण विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. पण हे कर्मचारी चार वर्षांचा कालावधी लोटूनही बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्यावर कुठलीच कारवाई सुद्धा करण्यात आली नाही. 

मर्जीतील कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांची मेहरबानी - जिल्हा परिषदेतील बहुतेक विभागात अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणारे काही कर्मचारी आहे. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांना रिलिव्ह न करता तेथेच कार्यरत ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या पण,त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. या कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ मेहरबान असल्याचे चित्र आहे.

असे आहे कार्यशाळेचे वेळापत्रक - सामान्य प्रशासन विभागाची कार्यशाळा ५ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२, वित्त विभाग ५ मे रोजी सकाळी १२ ते दुपारी १, कृषी विभाग ५ मे रोजी १ ते २, लघु पाटबंधारे विभाग ५ मे रोजी दुपारी ३ ते ४, बांधकाम विभाग ५ मे रोजी दुपारी ४ ते ५, पंचायत विभाग ६ मे रोजी सकाळी ११ ते २, महिला बालकल्याण विभाग दुपारी ३ ते ३.३०, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दुपारी ३.३० ते ४, पशुसंवर्धन विभाग मे रोजी ४ ते ४.३०, शिक्षण विभाग (प्राथ.) दुपारी ४.३० ते ६ आणि आरोग्य विभागाची कार्यशाळा ९ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजता पर्यंत घेण्यात येणार आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदTransferबदली