शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

हॅपी न्यू इयर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:35 IST

‘गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे.... भिजलेली आसवे झेलून घे... सुख-दु:ख झोळीत साठवून घे... आता उधळ सारे हे आकाशी, नववर्षाचा आनंद भरभरून घे...’ असे मनोमनी म्हणत नाशिककरांनी मावळत्या दिनकराच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचा जल्लोष केला.

ठळक मुद्देजल्लोषात स्वागत : रेस्टॉरंट फुललेसांस्कृतिक कार्यक्रमाच्या मैफली रंगल्या

नाशिक : ‘गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे.... भिजलेली आसवे झेलून घे... सुख-दु:ख झोळीत साठवून घे... आता उधळ सारे हे आकाशी, नववर्षाचा आनंद भरभरून घे...’ असे मनोमनी म्हणत नाशिककरांनी मावळत्या दिनकराच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचा जल्लोष केला.वर्ष नवे, पर्व नवे, नव्या आशा अन् नवी स्वप्ने बघत तरुणाईने सोमवारी (दि.३१) नवसंकल्प सोडला. वर्षाच्या अखेरचा सूर्यास्त होताच तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघाली. सरत्या वर्षात काय कमावलं, काय गमावलं याचे गणित न जुळवता केवळ नव्या आकांक्षेने नववर्षाचे स्वागताचा उत्साह सळसळत्या तरुण रक्तात संचारलेला पहावयास मिळाला.‘थर्टि फर्स्ट’च्या निमित्ताने सायंकाळपासून शहराचा नूर पालटलेला दिसून आला. मागील तीन दिवसांपासून पडणाºया कडाक्याच्या थंडीच्या तुलनेत अल्पसा का होईना सायंकाळी दिलासा मिळाला. कारण किमान तापमान दोन ते अडीच अंशांनी वाढलेले होते. बोचºया थंडीत तरुणाईने जल्लोषपूर्ण वातावरणात नव्या वर्षाचे स्वागत केले. गोदापार्क परिसरात संध्याकाळी साडेपाच वाजेपासूनच तरुण-तरुणींचे समूह एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर एकमेकांना नववर्षाचे संकल्प सांगण्यात येत होते.तरुणाईच्या आनंदाला उधाणशहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड या परिसरात तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. काहींनी चहाच्या कट्ट्यावर येत गप्पांचे फड रंगवून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या भागातील चाट भांडार, कॉफीशॉप, रेस्टॉरंट गजबजल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी ज्या मित्र-मैत्रिणींचा ३१ डिसेंबरला वाढदिवस होता त्यांचा वाढदिवसही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकNew Year 2019नववर्ष 2019