शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसातही पोळ्याचा उत्साह

By admin | Updated: September 2, 2016 01:42 IST

सालाबादाप्रमाणे यावर्षीसुध्दा स्थानिक उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले.

उत्कृष्ट जोडीचा सत्कार : घरोघरी बैलजोडीची पुजातिरोडा : सालाबादाप्रमाणे यावर्षीसुध्दा स्थानिक उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे पोळा ऐन रंगात आला असताना पावसाने हजेरी लावली. त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र त्यातही शेतकऱ्यांना उत्साहाने हा सण साजरा केला.तिरोडा शहर बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सच्या वतीने उत्कृष्ट प्रथम ५००१, द्वितीय ३००१ व तृतीय २००१ चे रोख पारितोषीक तसेच घुंगराची माळ व झुली देण्यात आल्या तसेच सर्वच जोडी मालकांना २५१ चे रोख प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. गुरूदेव सेवा मंडळ तिरोडा यांचेतर्फे प्रथम तीन जोडीचा सत्कार करून त्यांना संघटनेच्या वतीने स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पोळ्यामध्ये प्रथम बक्षिस छोटू बिसेन चुरडी यांना ५००१ रु., द्वितीय अनिल बिसन धार्मिक तिरोडा यांना ३००१ रु. तर तृतीय पारितोषिक सोहन राऊत तिरोडा यांना २००१ रु. रोख देवून करण्यात आला. हा सत्कार नगराध्यक्ष अजय गौर यांचे हस्ते खंडविकास अधिकारी एम.एस.मानकर यांचे अध्यक्षतेखाली माजी नगराध्यक्ष राजेश गुणेरिया, मोहन ग्यानचंदानी, माजी पोलीस पाटील बाळकृष्ण दृगकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ४० जोड्या उपस्थित झाल्याअसून सर्वांना २५१ रु.चे रोख पारितोषिक देण्यात आले. पोळ्याच्या कार्यक्रमाचे संचालन मुकेश अग्रवाल आभार प्रदर्शन पंकज देहलीवाल यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)