शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

हनुमान चौक रस्त्याचा वाद चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:32 IST

इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत.

ठळक मुद्देनगरसेवक उतरणार रस्त्यावर : ३१ तारखेपासून उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इंगळे चौक ते हनुमान चौकापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असून नगर परिषद प्रशासन त्यावर काहीच कारवाई करीत नसल्याने आता नगरसेवक रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत या रस्त्याचा सोक्षमोक्ष न लागल्यास ३१ तारखेपासून हनुमान मंदिरासमोर धरणे व साखळी उपोषण करणार असा इशारा नगरसेविका भावना कदम व अफसाना पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.इंगळे चौक ते हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याचे काम मागील तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. दुर्गा कंस्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले असून त्यांच्या मार्फत अन्य कंत्राटदार या रस्त्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. करण्यात आलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी रस्त्याचे बांधकाम बंद केले होते. मात्र मध्यंतरी पुन्हा हनुमान मंदिर ते शासकीय निवासस्थान पर्यंतच्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. सध्या ते कामही बंद दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील हा मुख्य रस्ता असून या मार्गानेच सामान्य नागरिकांसह रूग्ण व रूग्णवाहिकांची ये-जा असते.असे असतानाही मागील तीन महिन्यांपासून रस्ता बंद आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेत प्रभागाच्या नगरसेविका कदम व पठाण यांनी गुरूवारी (दि.२४) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ३० तारखेपर्यंत योग्य ती कारवाई करावी अन्यथा ३१ तारखेपासून हनुमान मंदिर समोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.या आहेत नगरसेवकांच्या मागण्यासदर रस्त्याचे काम करारनामा व अंदाजपत्रकानुसार होत आहे काय याचा अहवाल प्राप्त करावा, अंदाजपत्रकानुसार काम झाले नसल्याने लेव्हल नसून लोकांच्या घरासमोर पाणी साचून राहत आहे. त्यामुळे कामावरील कॉँक्रीटचे परिक्षण तपासून अहवाल द्यावा, या रस्त्यावरील नाली कंत्राटदाराने बुजवून टाकली असून नवीन नालीचे बांधकाम त्वरीत सुरू करावे, हनुमान मंदिर ते महिला समाज भवनपर्यंत खोदकाम झाले असून बंद असलेले काम त्वरीत सुरू करावे तसेच येथेही नवीन नालीचे बांधकाम करावे, महिला समाज भवन ते नेहरू चौकापर्यंत काम त्वरीत सुरू करावे, प्रभाग क्रमांक ६ मधील मंजूर विविध कामांची निविदा त्वरीत काढून मागणी असलेल्या कामांना त्वरीत मंजुरी देऊन काम सुरू करण्यात यावे, यातील दोषी व्यक्ती व संबंधित अधिकाºयांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. या मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस