शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

प्रेयसीच्या हत्येनंतर गळफास; चौकशीसाठी चौघे पोलिस ठाण्यात

By नरेश रहिले | Updated: December 25, 2023 15:22 IST

पुराडा येथील प्रेमीयुगूल मृत्यू प्रकरण :परिसरात विविध चर्चेला उधाण

गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२, रा. हलबीटोला, ता. देवरी, जि. गोंदिया) या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) याने आत्महत्या केल्याचे सालेकसा पोलिसांनी नमूद केले. परंतु या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी चार तरुणांना चौकशीसाठी सालेकसा पोलिस ठाण्यात बोलावल्याने परिसरात अनेक शंकाकुशंकांना पेव फुटले आहे.

टिकेश्वरीच्या आईने सालेकसा पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण केल्यावर त्या तिघी माय-लेकी एकाच खोलीत झोपी गेल्या. आई आणि बहिणीसाेबत झोपलेली टिकेश्वरी अचानक रात्री गायब झाली. २३ डिसेंबर रोजी सकाळी ती अंथरुणावर दिसली नाही. ती शौचास गेली असावी, असा आईचा समज झाला. परंतु उशीर होऊनही ती घरी न परतल्यामुळे आईची चिंता वाढू लागली. तिच्या शोधासाठी आई गावात गेली; परंतु त्यांना मुलगी दिसली नाही. सकाळी १०:३० वाजता फिर्यादीचा नातू नरेश संतोष मिरी याने टिकेश्वरीची आपल्या मोबाइलवर फोटो दाखवून ती पुराडा परिसरातील शेतात मृत पावल्याची माहिती दिली.

जेवण केल्यावर आपल्या आई आणि बहिणीसोबत झोपी गेलेल्या टिकेश्वरीचा रात्रीच खून होतो, ही बाब अनेकांना पचनी न पडणारी झाली. टिकेश्वरीच्या आईच्या तक्रारीवरून मृतक श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या घरापासून तब्बल ८ किलो मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.

मुलाच्या सोबत जाणाऱ्या मंडळींना पोलिसांनी बोलाविलेश्रीकांत रात्रीच्या वेळी एकटाच गेला नाही. त्याच्या सोबत मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या चार लोकांना सालेकसा पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले. परंतु ही चौकशी कोणत्या दिशेने होत आहे, यासंदर्भात पोलिसांनी गुप्तता पाळली असली तरी श्रीकांतने टिकेश्वरीचा खून करून स्वत: आत्महत्या केली की, त्या प्रेमीयुगुलांचा खून करण्यात आला या दोन्ही बाजूने तपास होणे गरजेचे आहे. त्या तरुणाची आत्महत्या नसल्याची चर्चा देवरी तालुक्यात आहे.