शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काम करणाऱ्यांना निवडून देण्यासाठी मार्गदर्शन करा

By admin | Updated: September 19, 2016 00:28 IST

नगर परिषद निवडणुकीत नागरिकांनी प्रलोभन व जातीवादात पडून बहुतांश अकार्यक्षम व स्वार्थी उमेदवारांना निवडून नगर परिषदेत पाठविले.

गोंदिया : नगर परिषद निवडणुकीत नागरिकांनी प्रलोभन व जातीवादात पडून बहुतांश अकार्यक्षम व स्वार्थी उमेदवारांना निवडून नगर परिषदेत पाठविले. त्याचे परिणाम शहरातील रस्ते, बंद पडलेल्या नाल्या व स्वच्छतेवरून दिसत आहेत. प्रोफेसर कॉलनीतील शिक्षकांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. आता मात्र या बुद्धीजीवींनी शहराच्या विकास व उज्वल भविष्यासाठी काम करणाऱ्या निस्वार्थ उमेदवारांना निवडून देण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. शहरातील कुडवा नाका स्थित प्रोफेसर कॉलनीतील सहा लाख रूपयांच्या रस्ता सिमेंटीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फक्त स्वार्थ सिद्धीसाठी लागले आहेत. अथक प्रयत्नांनंतर केंद्र शासनाने मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेला फक्त मलाई मिळाली नाही म्हणून सुरू करण्यात आले नाही. मात्र आता शासनाच्या नव्या नियमांमुळे या योजनेचा ६५ कोटींचा निधी परत जाने निश्चीत आहे. शहरात नगर परिषदेने केलेल्या कामांचे होर्डींग दिसून येत आहेत. मात्र प्रत्यक्ष स्वरूपात ही कामे दिसून येत नसल्याचेही त्यांनी सांगीतले. कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातून केलेली रिंग रोड नाला सिमेंटीकरण, पाण्याची निकासी व्हावी यासाठी दोन मोठे पुल, नवाउड्डाण पुल, शासकीय पॉलीटेक्नीक कॉलेज व अन्य विकास कामे दिसून येत आहेत. मात्र नगर परिषदेतील भाजपच्या कार्यकाळातील कामे नव्हे तर फक्त भ्रष्टाचारच दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. प्रभाकर गुप्ता यांनीही मत व्यक्त केले. प्रास्तावीक सेवानिवृत्त प्राध्यापक बी.पी.श्यामका यांनी मांडले. संचालन कॉंग्रेस महासचिव देवेंद्र अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला कॉंग्रेस शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक व्यंकट पाथरू, लोकेश रहांगडाले, प्रोफेसर कॉलनीचे अध्यक्ष एस.के.रायचौधरी, सचिव जे.पी.व्यास, कमल पाराशर, सुशिला अंबुले, एच.एच.पारधी, राजेश व्यास, प्रा.जफर खान, प्रा. अशोक हुकमानी, प्रा.अजय श्यामका, भावेश चव्हाण, आरिफ अंसारी, अहमर खान, अतूल शाह, भरत सिंग व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)