शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

गोंदिया जिल्ह्यात ‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 13:25 IST

सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळेत समविचार शिक्षण विभागाचा उपक्रम

हितेश रहांगडाले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सलग तीन वर्षात शाळा प्रवेश वाढविण्याच्या यशस्वी हॅटट्रिकनंतर यंदाही जिल्ह्यात गुढीपाडवा-शाळेत प्रवेश वाढवा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा परिषद शाळांसह नगर परिषदेच्या शाळांचा यात समावेश करण्यात आला आहे.शैक्षणिक सत्र २०१५-२०१६ पासून गोंदिया जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाचे फलीत झाले. गुढीपाडवा या एकाच दिवशी जिल्ह्यातील जि.प.शाळांमध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतले होते. या उपक्रमाला मिळत असलेला व्यापक प्रतिसाद पाहता तो यंदा देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शिक्षण विभाग यासाठी कामाला लागला आहे. अधिकाधिक विद्यार्थी शाळेत दाखल व्हावेत याकरिता जिल्ह्यातील शाळा सक्रियपणे कामाला लागलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या १०६९ शाळांसह जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या २२ शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार गोंदिया व तिरोडा नगर परिषद शाळातही सदर उपक्रम राबवून विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सदर उपक्रम सुरु झाल्यापासून जि.प. शाळांमध्ये दरवर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढतच आहेत. उपक्रम सुरु होण्यापुर्वी जिल्ह्यात इयत्ता पहिलीतील प्रवेशिका विद्यार्थी संख्या सत्र २०१४-१५ मध्ये सुमारे ३७००, त्यानंतर उपक्रमाचे फलीत मिळून २०१५-१६ मध्ये १०,१२० विद्यार्थी, २०१६-१७ मध्ये ११९५२ विद्यार्थी तर २०१७-१८ या सत्रात सुमारे १३००० विद्यार्थ्यांनी जि.प. शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेला आहे. गुढीपाडवा उपक्रम राबविण्यासाठी नवागत विद्यार्थ्यांना सजविलेल्या गाडीवर वाजत-गाजत मिरवणूक, लेझीम भजन दिंडीद्वारे शाळेत आणण्यात येणार आहे. उपक्रम अधिक यशस्वी व परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांना त्यांच्या कल्पकतेने भर घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याप्रसंगी प्रदीर्घ कार्यक्रम, भाषणे, कंटाळणाऱ्या बाबी टाळून उपकम मनोरंजक बनविण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

पालकांचा करणार सत्कारविद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या यशोगाथा सांगून पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शाळेत सकाळी शिक्षणाची गुढी उभारुन त्याचे महत्व जनसामान्यांना पटवून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर उपक्रम यशस्वी राबवून १०० टक्के पटनोंदणी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा सन्मान शिक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे.

डीआयईसीपीडीची चमू दिमतीलागोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळात विद्यार्थी प्रवेश वाढविण्यासाठी गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा यासारखे यशस्वी उपक्रम सुरु असताना गोंदिया जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआईसीपीडी) गोंदियातर्फे शैक्षणिक सत्र २०१८-१९ करीता सर्व दाखल पात्र मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दाखलापात्र मुलांनी माहिती मागून दाखल करण्यात येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष सोडविण्यासाठी संस्थेची चमू प्रत्यक्षात मदतीला येणार आहे.

अभिनव उपक्रमाचे कौतुकगुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा या अभिनव उपक्रमाची प्रेरणा देणारे गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सलग तीन वर्षापासून सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.तसेच अशाच अभिनव उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळांतर्फे पुष्पगुच्छ, भेटवस्तू, पुस्तके, गणवेश, गोड पदार्थ इत्यादीद्वारे नवागतांचे स्वागत केले जाणार आहे.- उल्हास नरडशिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.गोंदिया

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८