शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ठिकठिकाणी शाहू महाराजांना अभिवादन

By admin | Updated: June 29, 2015 01:21 IST

राजर्षी शाहू महाराजांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात सामाजीक न्याय दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली.

शाळेचा ठोका वाजला : प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारगोंदिया : राजर्षी शाहू महाराजांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात सामाजीक न्याय दिवस म्हणून थाटात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवासोबतच शाळांत शाहूंचा जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. अनसूया पशिने हायस्कूल व अर्चना पशिने कनिष्ठ महाविद्यालय, दासगावगोंदिया : शाळा व महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती व विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ थाटात साजरे करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. शाहू महाराजांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या बिसेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक गजभिये व नंदागवळी यांनी शाहूंच्या जीवनावर प्रकाश टाकला. पश्चात ८ वी ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक के. एस. बिसेन, ए.के. शेख, डी.आर. राठोड, आर. एम. नागपुरे, एम.एस. बिसेन, एस. के. उके, एस.पी. उके व अन्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संत कबिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दासगाव : शिवानी (गात्रा) येथील संत कबिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली.कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष अ‍ॅड. राजकुमार बोंबार्डे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थासचिव कमल बोंबार्डे, मार्गदर्शक म्हणून प्राचार्य रमेश तनवानी पर्यवेक्षक एच.जी. मेश्राम उपस्थित होते.शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे नवागताचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतून प्रभातफेरी काढण्यात आली. पाहुण्यांनी शाहू महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलीत करण्यात आले. पाहुण्यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणेनुसार कार्य करण्याचे आवाहन केले.संचालन एस.जी. बन्सोड तर आभार एच.जी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.जि.प. माध्य. शाळा तुमखेडा खुर्दगोंदिया : शाळेत राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिवस, नवगतांचे स्वागत व १ ते ७ विद्यार्थ्यीचे पुस्तक वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागेश्वर विखोडे, उद्घाटक अश्विनी अबांदे, प्रमुख पाहुणे राजेश नंदेश्वर, संजय लिल्हारे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सी. सी. सोनवाने, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राजेश नंदेश्वर यांनी मार्गदर्शन केले. संचालन शिक्षक पी.टी. पटले व आभार एस. जी. पिल्हारे यांनी मानले. शेवटी विद्याार्थ्याना गोड जेवन देवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ. शाळा बोरकन्हार : शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रक्षा गौतम यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पा कवरे, अंतकला ठाकरे, सेवकचंद बिसेन, रमणदास बोंबार्डे, शाळेचे मुख्याध्यापक रमन हुमे, प्रभा गायधने, रामचंद्र करंडे, संदीप मेश्राम, चंद्रकांत रासुरे, सुनिता मडावी, सुनिता टेकुले, विजय मेंढे, शारदा चौधरी उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिल्या वर्गात दाखल सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना पाठ्युपुस्तक वितरीत करून गोड पदार्थ देण्यात आले. पाचव्या वर्गात दाखल नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक रमण हुमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन संदीप मेश्राम तर आभार आर.एम.करंडे यांनी मानले. शारदा कान्व्हेंटगोंदिया : स्थानिक शारदा कॉन्व्हेंट शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती सहर्ष साजरी करून शाळेचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. २६ जून २०१५ ला राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. संचालिका योगिता बिसेन, प्राचार्य उषा रहांगडाले यांनी शाहू महाराजांच्या छायाचित्राचे पूजन केले. माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मंचावर वरिष्ठ शिक्षीका तारा खोटेले व शबाना शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व संशोधन तारा खोटेले व तक्षशिला चचाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोषसिंह नेकाने, धनेश्वर सारंगपुरे, राजेश बिसेन, पंकज फुंडे, नेहा पटले, विनोद खोब्रागडे, निशा मुनेश्वर यांनी सहकार्य केले. गोंदिया पब्लिक स्कूलगोंदिया : गोंदिया पब्लिक स्कूल येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे, सचिव डॉ. इंदिरा सपाटे, प्राचार्य रिता अग्रवाल, व्यवस्थापक प्रफुल वस्तानी उपस्थित होते. यावेळी अतिथींनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका वर्षा भांडारकर यांनी केले.याप्रसंगी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.डॉ. आंबेडकर युवक समितीगोंदिया : डॉ. आंबेडकर युवक समिती छोटा गोंदियातर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बुध्द विहार छोटा गोंदिया येथे साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पाडुरंग गजभिये, अतिथी म्हणून अ‍ॅड. विशाखा पाटील, सुशील गणविर, विजय उके, प्रशांत मेश्राम, वसंत वैद्य उपस्थित होते. यावेळी सुशिला गणविर यांनी विधवा पुर्नविवाह व आंतरजातीय विवाहवर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी शोभा रामटेके, दिपीका रंगारी, तरासन बंसोड, अनुसया उके, निर्मला बंसोड, रुखमा वैद्य, विद्या गणविर, शोभा रंगारी, मिरन मेश्राम, सुनिता चव्हाण, ठुनाजी उके, रविंद्र मेश्राम, मुकेश मेश्राम, तरूण गोंगले, हेमंत रामटेके यांनी सहकार्य केले. ओबीसी सेवा संघगोंदिया : सिव्हील लाईन मामा चौकात ओबीसी सेवा संघ व लॉर्ड बुध्दा मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉर्ड बुध्दा मैत्री संघाचे जिल्हाध्यक्ष रतन वासनिक होते. ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलाश भेलावे, रमेश ठवरे, प्रदीप ठवरे, संतोष वैद्य, नईम शेख, सतीश खरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार चावके, राजा देशमुख, लोकेश शुक्ला, सुनिल चावके, प्रदीप कोटमकर, बबलू शेख, रंजीत बंसोड, मिलिंद हांडोरे, प्रेम साठवणे, सतीश मेश्राम, संदीप कोटमकर, इरफान खान, भुवन बिसेन, आरिफ खान यांनी सहकार्य केले. नूतन विद्यालयगोंदिया : नूतन विद्यालय मामा चौक येथे राजर्षी शाहू महाराज जयंती पर्यवेक्षक वाय.पी. बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून जी.आर. कापगते, एस.झेड. मेश्राम, बावनथडे, ए.ए. उपवंशी, पी.बी.येळे, भुते, बिसेन, दुबे, नेवारे, गौर उपस्थित होते. संचालन एस.एस. ठाकुर तर आभार बी.आर.पटले यांनी मानले. यशस्वीतेसाठी निखिलेश यादव, एन.जे. तिवारी, मुकेश कुंभलवार, कुंदन शेंडे, बावनथडे, परिहार, फत्तेलाल, कुंदन पटले उपस्थित होते. स्वामी टेऊराम शाळा गोंदिया : सिंधी शिक्षण संस्थेतर्फे संचालित स्वामी टेऊराम आदर्श इंग्लीश हायस्कूल गोंदिया येथे राजर्षी शाहू महाराज जयंती मुख्याध्यापिका अमिता जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. अतिथी म्हणून शिक्षीका श्रीमती गुप्ता, अमृते चिमनानी उपस्थित होते. संचालन भक्तानी तर आभार शिक्षीका पालेवार यांनी मानले.