शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

सालेकसा तालुक्यात हिरवळ

By admin | Updated: July 8, 2016 01:53 IST

राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला होता. या संकल्पाला शंभर टक्के प्रतिसाद देत सालेकसा तालुक्यात विविध संगठन,

विविध यंत्रणांचा सहभाग : पावणेदोन लाख रोपट्यांची लागवड सालेकसा : राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केला होता. या संकल्पाला शंभर टक्के प्रतिसाद देत सालेकसा तालुक्यात विविध संगठन, लोकसहभाग तसेच सरकारी यंत्रणेतील सर्व विभागाच्या सहकार्याने वन विभागाने पावणे दोन लाख रोपटे लावण्यात यश प्राप्त केले, अशी माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे व तालुक्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांनी लोकमतला दिली आहे. तालुक्यात एकूण ४२ ग्रामपंचायती असून यापैकी १४ गावांची निवड करून वन विभागाने वृक्षारोपणाचा संकल्प घेत विशेष मोहीम राबवून दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर प्रशासकीय स्तरावर इतर सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत व शाळा-महाविद्यालयाच्या सहकार्याने २५ हजार वृक्ष लावण्यात आले. असे एकूण पावने दोन लाख वृक्ष सालेकसा तालुक्यात लावण्यात आले. वृक्षारोपण अभियानात तालुक्यात सर्वस्तरावर यशस्वी सहभाग लाभल्याने तालुक्यात हिरवळ पसरणार आहे. वनविभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात स्थानिक आमदारासह जि.प. अध्यक्ष, चार जिल्हा परिषद सदस्य, आठ पंचायत समिती सदस्य, ८४ ग्रा.पं. सदस्य, अशासकीय संगठनांचे ३१ कार्यकर्ते, वन व्यवस्थापन समितीचे ११० सदस्य, महिला बचत गटातील २९२ महिला, पोलीस विभागातील २४ कर्मचारी, एक हजार ८२३ विद्यार्थी व एक हजार १७४ नागरिकांच्या सहकार्याने आणि एक हजार ९३३ मजुरांच्या मदतीने एक लाख ४८ हजार रोपटे लावण्यात आले. यात तालुक्यातील २०० शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभाग लाभला. उर्वरीत रोपट्याची लागवड करण्यासाठी तहसील कार्यालय, कृषी कार्यालय ग्रामपंचायती, पंचायत समिती, पोलीस ठाणे, आरोग्य, सिंचन, शिक्षण तसेच अशासकीय संगठनांच्या सहकार्याने उद्दिष्टपूर्ती करण्यात आली. एकंदरीत सर्वस्तरावरील प्रयत्नामुळे तालुक्यात एक लाख ७१ हजार २६५ रोपट्यांची लागवड करण्यात आली. यंदा वृक्षारोपण कार्यक्रम जनआंदोलन बनले असून यात शासन प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, सामान्य नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, महिला-मुलींच्या तसेच पोलीस, सुरक्षा दल यांच्यासह स्वयंसेवी संस्थासुध्दा नि:स्वार्थ भावनेने पुढे येऊन सहभाग दिला.(तालुका प्रतिनिधी)-१२ हजार रोपट्यांची लागवडवनविभागाच्या विशेष पुढाकाराने ज्या १४ गावांत वृक्षारोपण कार्यक्रमाची विशेष मोहीम राबविण्यात आली, त्यामध्ये गिरोला येथे ९६३ लोकांनी ११ हजार रोपटे लावले. हलबीटोला परिसरात २७४ लोकांनी १२ हजार वृक्ष लावले. निंबा परिसरात ७५७ लोकांनी पाच हजार ५०० झाडे लावली. बिंझली परिसरात २५३ लोकांनी ११ हजार वृक्ष लावले. टोयागोंदी क्षेत्रात ६३५ लोकांनी ११ हजार वृक्ष, धनेगाव परिसरात ४३३ लोकांनी पाच हजार ५०० वृक्ष, कडोतीटोला परिसरात १७१ लोकांनी पाच हजार ५०० वृक्ष, पाथरी (कुंभारटोला) भाग-१ क्षेत्रात ४५५ लोकांनी १२ हजार रोपटे, कुंभारटोला भाग-२ क्षेत्रात २९८ लोकांनी १८ हजार ४८० वृक्ष, दुर्गुटोला परिसरात २२७ लोकांनी १० हजार वृक्ष, भजियादंड क्षेत्रात १७८ लोकांनी १० हजार, शेरपार क्षेत्रात ३०२ लोकांनी १२ हजार रोपटे, दरबडा क्षेत्रात ४०१ लोकांनी १२ हजार वृक्ष आणि खोलगड परिसरात ३४० लोकांनी १२ हजार वृक्षाची लागवड केली. पोलीस ठाण्यात वनमहोत्सव सालेकसा पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचारी व सी-६० च्या जवानांनी वन महोत्सव कार्यक्रम साजरा करीत वृक्षारोपण केले. पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांच्या मार्गदर्शनात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन याविषयी चर्चासत्र घेवून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने एक रोपटे लावले. या वेळी ८० पेक्षा जास्त रोपटे लावण्यात आले. तसेच वृक्षांना खत पाणी घालून संवर्धित करण्याचा संकल्प घेण्यात आला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल कदम उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, चव्हाण, यादव, दिक्षीत, गिरी, दसरिया यांच्यासह पुरूष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.