शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांतील नळ योजनांना ग्रीन सिग्नल

By admin | Updated: July 21, 2014 23:55 IST

ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता

गोंदिया : ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली आहे. नुतकेच पार पडलेल्या जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीच्या सभेत हि मंजूरी देण्यात आली आहे. या योजनांची अंदाजपत्रकीय किंमत १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपये एवढी आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. गावांत नळ पाणी पुरवठा योजना नसल्याने हातपंप, विहीरी किंवा अन्य जलस्त्रोतांमधून नागरिकांना आपली तहान भागवावी लागते. परिणामी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजार फोफावतात व कधी तर काहींना जीव गमवावा लागतो अशी स्थिती असते. अशात गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मिळावी अशी प्रत्येक गावकऱ्यांची मागणी असते. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजने मार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१३-१४-१५ मधील कृती आराखड्यात ग्रामीण भागातून नळ पाणी पुरवठा योजनांची मागणी करण्यात आली होती. या मागणीवर निर्णय घेण्याच्या दृष्टीने नुकतीच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेत हा विषय मांडण्यात आला. यावर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा उदात्त हेतू पुढे ठेऊन अध्यक्षांनी २० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांना मंजूरी दिली. मंजूरी देण्यात आलेल्या योजनांमध्ये गोंदिया तालुक्यातील बनाथर, मोरवाही, नवरगाव कला, बटाना, डोंगरगाव, मुंडीपार, धानमगाव, मजितपूर, गिरोला, चुटीया, बिरसोला, रापेवाडा, गोरेगाव तालुक्यातील सर्वाटोला, तिरोडा तालुक्यातील कोडेलोहारा, सेजगाव, भजेपार, काचेवानी, सालेकसा तालुक्यातील गिरोला, आमगाव तालुक्यातील महारीटोला व सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी या गावातील योजनांचा समावेश आहे. या योजनांचे १३ कोटी २२ लाख ४५ हजार १७० रूपयांचे अंदाजपत्रक असून लवकरच या योजनेची कामे पूर्ण होतील असे अध्यक्षांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)