शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

२० वर्षानंतर गोंदिया जिल्ह्यात आढळले ग्रेटर फ्लेमिंगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:44 IST

मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे.

ठळक मुद्देसौंदडच्या तलाव परिसरात झाले दर्शनएकाच सोबत ३४ ग्रेटर फ्लेमिंगोचा थवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जैवविविधता धोक्यात येत आहे. मात्र या जैवविविधतेला टिकविण्यासाठी वन्यजीवप्रेमी पुढे येत असल्यामुळे पशू, पक्षी यांची संख्या स्थिर आहे.स्थलांतरीत पक्षीही जिल्ह्यात दाखल होतात. मागील २० वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात दिसलेले ग्रेटर फ्लेमिंगो हे स्थलांतरीत पक्षी बुधवारी (दि.१) प्रथमच सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथील तलाव परिसरात आढळले. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी आणि पर्यावरण प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदायक बातमी आहे.

जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात विदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि पक्षी मित्रांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. जिल्ह्यातील जैवविविधा कायम राहावी यासाठी जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमी संस्था प्रयत्नरत आहेत. त्यातूच जिल्ह्यात सारस संवर्धन केले जात असल्याने सारस पक्ष्यांच्या संख्येतसुध्दा वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्याला सारसांचा जिल्हा अशी एक नवीन ओळख प्राप्त होवू लागली आहे. १ जुलैला तब्बल ३४ संख्या असलेले ग्रेटर फ्लेमिंगो नागरिकांना पाहायला मिळाले.

२० वर्षाआधी त्याच तलावात दोन ग्रेटर फ्लेमिंगो दिसल्याची नोंद आहे. स्थलांतर करताना एक-दोन दिवसासाठी मध्ये मुक्काम करतात. अन्न आणि आराम करण्यासाठी ते सौंदडच्या तलावात थांबले आहेत. साधारणत: पाकिस्तानचा सिंध प्रांतात, नेपाळचा तराई भाग, बांग्लादेश, श्रीलंका येथे स्थलांतर करतात. त्यानंतर गुजरातच्या कच्छ भागात सप्टेंबर ते आॅक्टोबर व मार्च ते एप्रिल या काळात विन (अंडी) घालतात. ग्रेटर फ्लेमिंगो (मोठा समुद्र राघू) चे गोंदिया जिल्ह्यात दर्शन होणे ही बाब गोंदिया जिल्ह्यातील जैवविविधतेला पोषक आहे. 

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य