शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:26 IST

नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांचा ५० कोटींचा आराखडा १६ जानेवारीपर्यंत मंजूर करा. अन्यथा १७ जानेवारीपासून प्रवेशबंदी करून भिकमांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवेगावबांध फाऊंडेशनने दिला आहे.

ठळक मुद्देनवेगावबांध फाऊंडेशन : प्रवेशबंदी व अर्धनग्न भिकमांगो आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसराच्या विकास कामांचा ५० कोटींचा आराखडा १६ जानेवारीपर्यंत मंजूर करा. अन्यथा १७ जानेवारीपासून प्रवेशबंदी करून भिकमांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नवेगावबांध फाऊंडेशनने दिला आहे.नवेगावबांध फाऊंडेशनने ३१ डिसेंबरपर्यंत विकास आराखडा पूर्ण करावा, असा इशारा तीन महिन्यांपूर्वी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री राजकुमार बडोले, मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांना दिला होता. परंतु शासनाकडून याबाबत कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे फाऊंडेशनने आंदोलन पुढे ढकलून १६ जानेवारी २०१८ पर्यंत ५० कोटींचा विकास आराखडा मंजूर करा अन्यथा अर्धनग्न भिकमांगो आंदोलन व लोकप्रतिनिधींना संकुल परिसरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे.राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसरातील हिलटॉप गार्डनमध्ये झालेल्या नवेगावबांध फाऊंडेशनच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.अध्यक्षस्थानी उपसरपंच रघुनाथ लांजेवार होते. बैठकीला फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय डोये, सचिव रामदास बोरकर, सरपंच अनिरुध्द शहारे, माजी जि.प. सदस्य विशाखा साखरे, ग्रामपंचायत सदस्य शितल राऊत, लीला सांगोळकर, सविता बडोले, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, अन्ना डोंगरवार, मुकचंद गुप्ता, दिलीप शिपानी, नामदेव डोंगरवार, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, राजू पालीवाल, मुकेश जायस्वाल, होमराज पुस्तोडे, खुशाल कापगते, सरपंच संजय खरवडे, सुदेश ठाकूर, नवल चांडक, मुन्ना शुक्ला, हिरासिंग गौतम, संदीप मोहबंशी आदी उपस्थित होते.तीन महिन्यांपूर्वी फाऊंडेशनने लोकप्रतिनिधी, राज्य शासन व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले होते. मात्र अद्यापही राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसराच्या विकासासाठी ५० कोटींचा विकास आराखडा मंजूर करण्यासंदर्भात कोणतेही काम केले नाही. राष्ट्रीय उद्यानाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पालकमंत्री तथा स्थानिक आ. राजकुमार बडोले व जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासनापलीकडे ठोस असे काहीच केले नाही. याबाबत बैठकीत खेद व संताप व्यक्त करण्यात आला.आतापर्यंत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी अनेकदा बैठकी झाल्या. परंतु आश्वासन व बैठकीच्या पुढे विकासाची गाडी जात नाही. २० जुलैच्या प्रत्यक्ष पाहणीत ५० कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र प्रस्तावही तयार झाला नाही व विकास कामांना सुरुवातही झाली नाही. याबाबत फाऊंडेशनच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.नवेगावबांध फाऊंडेशनतर्फे अर्धनग्न भिक मांगो आंदोलन करुन जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांना पाठवून संकुल परिसराचा विकास करा, अशी मागणी करण्यात येणार आहे. असेही असे बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला फाऊंडेशनचे तालुक्यातील सदस्य, परिसरातील नागरिक व स्थानिक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.आंदोलन ढकलले पुढे५० कोटींचा निधी असल्याने शासकीय नियोजन करायला जास्त कालावधी लागतो. त्यामुळे थोडा आणखी कालावधी द्यावा, असे मत काही जेष्ठ सदस्यांनी व्यक्त केले. त्यामुळे संकुल परिसराच्या विकासासाठी भिक मांगो आंदोलन व लोकप्रतिनिधींना प्रवेश बंदी आंदोलन १६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.