शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाने केला ३६ लाखांचा अपहार, दोन दिवसात तीन ग्रामसेवकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 18:08 IST

९२ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अफरातफर प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सोमवारी दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी (दि.१३) सालेकसा तालुक्यातील तत्कालीन एका ग्रामसेवकावर ३६ लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ एम. राजा. दयानिधी यांनी दिले आहे. यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

गोंदिया : ९२ लाख रुपयांच्या शासकीय निधीच्या अफरातफर प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सोमवारी दोन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर मंगळवारी (दि.१३) सालेकसा तालुक्यातील तत्कालीन एका ग्रामसेवकावर ३६ लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ एम. राजा. दयानिधी यांनी दिले आहे. यामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सालेकसा तालुक्याच्या कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी खंडविकास अधिकारी सालेकसा व अर्जुनी मोरगाव यांना दिले आहेत. प्राप्त माहितीनुसार सालेकसा तालुक्याच्या ग्रामपंचायत कावराबांध येथे कार्यरत असताना ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याने दप्तरी प्रमाणके नसताना प्रमाणकाशिवाय खर्च नोंदविणे, खरेदी केलेल्या साहित्याचा नोंद साठा रजिष्टरला न घेणे, बँकेतून धनादेशाचे शोधन स्वत: रोखीने करणे, मासिक सभा व ग्रामसभेचे कार्यवृत्त ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध न ठेवणे, ग्रामपंचायत दस्ताऐवज अद्यावत न करता वारंवार वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे आदीचा ठपका रोकडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासर्व प्रकरणात चौकशी केली असता रोकडे दोषी आढळले. त्याची चौकशी सुरू असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ग्रामपंचायत भरनोली येथे बदली करण्यात आली. त्या ठिकाणीही त्याने अपहार केल्यामुळे त्याच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. वारंवार पैसे हडपण्याची सवय रोकडे यांची मोडत नसल्याचे पाहून त्याला निलंबित करुन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीईओ दयानिधी यांनी दिले आहे. व्ही.जे.रोकडे याने महाराष्टÑ जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९९७ मधील नियम ३ चे उल्लघंन केले आहे. त्यांनी अपहारीत केलेली शासकीय रक्कम त्यांच्याकडून वसूल करणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणात योग्य व नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ती रक्कम जमा करीत नसल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून शासकीय रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा