शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

अंजोऱ्याच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पारित

By admin | Updated: November 1, 2014 23:09 IST

आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे.

साखरीटोला : आमगाव तालुक्यातील अंजोरा येथे महिलांनी संघटित होऊन पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत ५० टक्केपेक्षा जास्त महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मत दिल्यामुळे तळीरामांना चांगलीच चपराक बसली आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासून याकरिता अंजोरा येथील महिला प्रयत्नशील होत्या. परंतु येणकेन कारणामुळे हे प्रयत्न फळास येत नव्हते.३० आॅक्टोबरला घेण्यात आलेल्या विशेष महिला ग्रामसभेत उपस्थित पहिलांपैकी ५० टक्केच्या वर महिलांनी दारूबंदी करण्यात यावी याचे समर्थन केले. या विशेष ग्रामसभेचा अहवाल शुक्रवारी गावचे सरपंच शिवणकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाला सादर केला. तो अहवाल पडताळून पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी त्या गावात दारूबंदी लागू करायची किंवा नाही याचा निर्णय घेतील.मागील तीन वर्षापासून सतत महिलांनी गावात दारुबंदी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायतकडे रेटून धरली होती. त्यानुसार मागील वर्षात महिलांची ग्रामसभा घेण्यात आली होती. परंतु उपस्थित महिलांपैकी केवळ ४० टक्के महिलांनी समर्थन केल्याने दारुबंदी शक्य होऊ शकली नव्हती. मात्र गुरूवारी पार पडलेल्या सभेत सातशेच्यावर महिलांनी हजेरी लावून महिला शक्तीचा परिचय देत ५० टक्केच्यावर महिलांनी दारूबंदी करण्याचा निर्धार केला व त्यात त्या यशस्वी ठरल्या.दारुबंदी अधिनियम २५ मार्च २००८ नियम (३) नुसार ग्रामसभेत उपस्थित महिलांपैकी ५० टक्केच्यावर महिलांनी दारुबंदी करण्यात यावी याचे समर्थन केल्यास जिल्हाधिकारी दारुबंदी घोषित करावी लागते. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या अधिनियमानुसार सदर तपासण्यात येते. महिला व ग्रामवासियांची मागणी लक्षात घेवून ३० आॅक्टोबरला ग्रामपंचायतच्या पटांगणात सरपंच अशोक शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक प्रशांत गोतमारे, आमगावचे ठाणेदार बी.डी. मडावी, नायब तहसीलदार बागडे, जि.प. सदस्य रमेश बहेकार, पं.स.चे विस्तार अधिकारी खोटेले, पोलीस उपनिरीक्षक शरद शेळके, पोलीस पाटील सुलोचना बहेकार, तंमुस अध्यक्ष पोतन रहांगडाले, मंडळ अधिकारी के.बी. कोरे, उपसरपंच संतोष गायधने, माजी सरपंच सरस्वता तुरकर, सुनीता चौबे, देवेंद्र मच्छिरके, रंजू चौधरी, तसेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.ग्रामसेविका उषा पाटील यांनी सभेचे प्रास्ताविक व रुपरेषा समजावून दिली तसेच उत्पादन शुल्क निरीक्षक गोटमारे यांनी सभेत करावयाच्या कारवाईची माहिती दिली व मतदार यादी भाग १०९ व ११० यातून उपस्थित महिलांचे नाव पुकारुन त्यांचे दारूबंदी विषयीचे समर्थन असल्याचे त्यांच्या नावापुढे नोंद करण्यात आली. मात्र ज्या महिलांकडे ओळखपत्र (मतदार) आहे त्यांनाच यात भाग घेता आला हे विशेष. यात उपस्थित महिलांपैकी ५० टक्केच्यावर महिलांनी दारुबंदी करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. ही प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. महिलांमध्ये भालीटोला, हलबीटोला व अंजोराच्या या गटग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महिलांचा सहभाग होता. दारूबंदी करण्याकरिता सर्वप्रथम गावात दारुबंदी समिती गठित करण्यात आली होती. अंजोरा येथे परवानाप्राप्त एक देशी दारूची दुकान आहे. दारुबंदी करण्याकरिता गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)