शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

By admin | Updated: August 17, 2015 01:40 IST

हिशोब न सादर न केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा विरोध करीत ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.

पांढरी येथील घटना : ग्रामविकास अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पांढरी : हिशोब न सादर न केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा विरोध करीत ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. स्वातंत्र दिनी आयोजित ग्रामसभेत हा प्रकार घडला असून ग्रामविकास अधिकाऱ्यांना हटविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रत्येक गावात १५ आॅगस्ट रोजी आमसभेचे आयोजन केले जात असून त्यामध्ये नवीन कामांची रुपरेखा आखली जाऊन तंटामुक्त समितीसह अन्य समित्यांची निवड केली जाते. त्यानुसार येथील सभा सुरू असताना गावकऱ्यांनी येथील ग्रामविकास अधिकारी एम.एस. रामटेके यांना मे महिन्याची ग्रामसभा न झाल्यामुळे मागील हिशेब मागितला. परंतु रामटेके यांनी हिशेब न दिल्यामुळे ग्रामवासीयांनी कुठे तरी भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करून त्यांना सर्व दस्तावेज सादर करण्यास सांगितले. परंतु त्यांनी दस्तावेज सादर न केल्याने गावकऱ्यांनी सरपंच अनिल मेंढे व संपर्क अधिकारी एन.जे. रहांगडाले यांच्या समोर ग्रामसभेची प्रोसिडींग लिहून घेतली. तसेच समस्त गावकरी व पोलीस पाटील उत्तम कोटांगले, यादोराव मदनकर यांच्या समक्ष सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खोलीला कुलूप ठोकले. ग्रामविकास अधिकारी रामटेके यांच्याकडे डुंडा व पांढरी ग्रामपंचायतचा कारभार असून ठरलेल्या दिवशी ग्रा.पं. कार्यालयात ते हजर राहत नाही. त्यामुळे जनतेला दाखल्याकरिता भटकंती करावी लागते. ग्रामसभेत झालेला ठराव पंचायत समितीला पाठवित नसल्याने गावामध्ये विकासाची कामे होत नाही. झालेल्या कामाचे बिल कंत्राटदाराला देत असून कॅशबुकवर लिहले जात नाही. असा भोंगळ कारभार सुरू असून त्यांची तक्रार खंडविकास अधिकारी रामदास धांडे यांना दिली असता तेही रामटेके यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात तक्रार दिली. मात्र त्यांनी सुध्दा कसलीही कारवाई न केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आठ दिवसापूर्वी पांढरी व डुंडा ग्रामपंचायतचे आॅडीट झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आॅडीट कशाप्रकारे केले याची चौकशी व्हावी, मागील पाच वर्षांचा हिशेब देण्यात यावा तसेच रामटेके यांना पांढरी व डुंडा ग्राम पंचायत मधून काढण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा खंडविकास अधिकारी यांच्या समक्ष करण्यात यावी, ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी द्यावे. अशा प्रकारे सदर आमसभेची प्रोसिडींग ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन त्यांच्या खोलीला गावकरी, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील व ग्रामपंचायतचे अधिकारी यांच्या समक्ष कुलूप लावण्यात आले. रामटेके यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे तरी चौकशी करून कारवाईची मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)