शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक कमालीची रंगणार

By admin | Updated: July 18, 2015 01:19 IST

स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने निवडणूक कमालीची रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बोंडगावदेवी : स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने निवडणूक कमालीची रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गावातील नेत्यांनी चारही वॉर्डात आपले समर्थक उभे केल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. पहिल्या प्रथमच ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एकाच वॉर्डातून पती-पत्नी रिंगणात उतरले तर ‘माय-लेक दोन वॉर्डातून राजकीय आखाड्यात उतरल्याने गावात राजकीय वातावरण तापलेले आहे.येत्या २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ११ जागेसाठी एकूण २९ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले आहेत. ४ वॉर्डात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. ग्रामपंचायतस्तरावर आपले वर्चस्व अबाधीत राहून गावच्या राजकारणाची चाबी आपल्या हातात राहण्यासाठी स्थानिक नेत्यांनी आपआपल्या समर्थकांच्या पॅनल घोडामैदानात उतरविल्या दिसत आहेत. वॉर्ड क्र.१ ,२ व ३ मध्ये तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. फक्त वॉर्ड क्र.४ मध्ये एका समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असल्याचे सबक समोर ठेवून इतर पॅनलच्या उमेदवारांना माघारी घेण्याचे यशस्वी शिष्टाई नेत्यांनी केल्याने यामध्ये सरळ लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी पहिल्या प्रथमच भाजपा समर्थकांमध्ये दोन गट पडलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून गावात कोणत्या गटाचे प्राबल्य आहे हे मतदानानंतर दिसून येईल. वॉर्ड क्र. १ मध्ये विद्यमान ग्रा.पं. सदस्य राधेशाम झोळे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची सौभाग्यवती वॉर्ड क्र.१ मधून सर्वसाधारण जागेसाठी मैदानात उतरल्या आहेत. पती-पत्नीच्या उमेदवारीने गावातील जनतेचे लक्ष वॉर्ड क्र.१ मध्ये लागलेले आहे. वॉर्ड क्र.१ मध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नलिनी नेवारे दुसऱ्यांना निवडणुकीत उभे असून वॉर्ड क्र.२ मधून त्यांचे चिरंजीव नामाप्र जागेमधून पहिल्या प्रथमच निवडणुकीत उतरले आहेत. गावातील तीन वॉर्डामध्ये तिहेरी लढत होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गावातील सर्वाच्या नजरा वॉर्ड क्र.४ मध्ये लागल्या आहेत. या वॉर्डात येथील मानवता विद्यालयाचे संचालक तसेच तालुका खरेदी विक्री समितीचे संचालक राकेश लंजे रिंगणात असून त्यांची लढत अमरचंद ठवरे यांच्याशी होणार आहे. एकंदरित येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या प्रथमच गावातील प्रतिष्ठित व नवखे चेहरे उतरल्याने गावात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षीत असल्याने कित्येकांना आतापासूनच सरपंच पदाचे डोहाळे लागलेले आहे. सरपंच पदाचे स्वप्न पाहून कित्येकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय सारीपाटाची खेळी खेळून स्वत:च उमेदवारी हस्तगत केल्याचे गावात बोलल्या जात आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतदानानंतर कळेल. सर्वाच्या नजरा ग्राम पंचयात निवडणुकीकडे आहेत. (वार्ताहर)