शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शेळीपालनाने सरस्वतीला मिळाले आर्थिक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:43 IST

सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली.

ठळक मुद्देकीर्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गट : परतफेडीमुळे कर्ज मिळणे झाले सुलभआम्ही स्वयंसिद्धा -६

आॅनलाईन लोकमतगोंदिया : सालेकसा तालुक्याच्या पानगाव येथून तीन किमी अंतरावर सोनपुरी गाव आहे. या गावात सरस्वती महेश कुराहे ह्या दारिद्र्यावस्थेत सहकुटुंब जीवन जगत असतानाच त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण गरिबीतून बाहेर पडू शकतो, अशी प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यांनी गावातील कीर्ती स्वयंसहाय्यता महिला बचत गटातून कर्ज घेऊन शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला व आज त्यांची गरिबीतून बाहेर पडण्याची धडपड सुरू आहे.सुरूवातीला गावातील महिला गटात येण्यास घाबरत होत्या. गटात आल्यावर कर्ज घ्यायलासुद्धा घाबरत होत्या. मात्र नंतर ११ महिला कीर्ती बचत गटात आल्या. त्यापैकीच एक सरस्वती कुराहे. महिलांना ५० रूपये मासिक बचत करण्याची सवय लागली. अंतर्गत कर्ज घेणेही सुरू केले. परतफेडीचीही सवय लागली. त्यानंतर सरस्वती यांनी सीआयएफ १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यांनी दोन शेळ्या खरेदी केल्या. गावातच त्यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू झाला. तसेच ग्रामसंस्थेमध्ये दर महिन्याला ६६७ रूपये यानुसार कर्ज परतफेड करणे सुरू केले.त्यातच त्यांना कर्ज परतफेडीची चांगली सवय लागली. त्यानंतर त्यांना पुन्हा कर्जाची गरज पडली. आयसीआयसीआयमधून त्यांनी १० हजार रूपयांचे कर्ज घेतले. त्या कर्जातून त्यांनी पुन्हा शेळ्या खरेदी केल्या. त्या कर्जाची परतफेडसुद्धा ५०० रूपये महिना याप्रमाणे करीत आहेत. अशाप्रकारे सरस्वती यांनी आपल्या जीवनाची सुरूवात करून गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता कर्ज घेण्याची भीतीसुद्धा त्यांच्या मनातून निघून गेली. आणखी कर्ज घेवून आपला व्यवसाय वाढवावे, असा चंग त्यांनी बांधला आहे.गटातून कमी व्याजदराने कर्ज घ्या, व्यवसाय करा, गरिबीतून बाहेर पडा व आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांचे योग्यरीत्या लालनपालन करा, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. त्यांच्या शेळीपालन व्यवसायातून अनेक महिलांनी प्रेरणा घेवून त्यासुद्धा शेळीपालनासाठी पुढे आल्या आहेत.नियमित परतफेडसोनपुरी गावात माविमचे १२ गट आहेत. एक एसटी गट आहे. सर्व गट महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित असून गटातील सर्वच महिला गरीब व गरजू आहेत. कीर्ती स्वयंसहायता महिला बचत गटात एकूण ११ सदस्य असून त्यापैकीच एक म्हणजे सरस्वती महेश कुराहे. मासिक बचत प्रत्येकी ५० रूपये आहे. ललिता राजकुमार कुराहे गटाच्या अध्यक्ष तर मंतुरा लिलाराम कुराहे सचिव आहेत. या गटातील महिला कर्ज घेऊन नियमित परतफेड करीत आहेत.