शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 21:22 IST

भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो. मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : आठवे शिक्षक साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो. मात्र केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकार नवीन नवीन धोरण तयार करुन सरकारी शाळा बंद पाडण्याचा कट करीत आहे. शिक्षणाची मूळ पायरी काढून घेवून शिक्षण व्यवस्था संपविण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केला.शिक्षक भारतीतर्फे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी (दि.२२) संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, आ.कपिल पाटील, अशोक बेलसरे, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, संस्था कार्याध्यक्ष जयवंत पाटील उपस्थित होते. शिक्षक साहित्य संमेलनच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन खा.पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. पटोले म्हणाले, सरकारच्या धोरणाचा फटका केवळ शिक्षकांनाच बसला नसून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुध्दा यात भरडली जात आहे. सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी शाळा उघडून शिक्षणाचा पाया बळकट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे शिक्षकांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार प्रसार करुन जे शिक्षण व्यवस्था संपविण्यास निघाले आहे त्यांनाच संपवून नवीन शैक्षणिक क्रांती निर्माण करण्याचे आवाहन केले. समाजाला शिकक्षित आणि जागृत करण्याची क्षमता केवळ शिक्षकांमध्ये असल्याचे पटोले यांनी सांगितले.पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या व जाचक धोरणामुळे जि.प.शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकार कमी पटसंख्येचे कारण देत शाळा बंद करुन शिक्षकांची कपात करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. शाळा बंद झाल्या तर संस्कारीत पिढी कशी निर्माण होईल त्यामुळे शाळा जीवंत राहू द्या असे मार्मिक मत व्यक्त केले. तर लोककवी अरुण म्हात्रे यांनी शिक्षकांंमधील सृजन आणि साहित्याला वाव मिळावा यासाठीच हे साहित्य संमेलन असल्याचे सांगितले. ग्रंथ दिंडी व शाळेची घंटा वाजवून शिक्षक साहित्य संमेलनाची सुरूवात झाली.-तर लोकशाही संपुष्टात येईललोकांकडील मोबाईल आणि संगणकातील माहितीवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने दहा खासगी कंपन्याची नियुक्ती केली आहे. सरकारच्या धोरणामुळे संविधानाचे मुळ असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असून यामुळे लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे माजी खा.नाना पटोले म्हणाले.सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कारशिक्षक भारतीतर्फे संमेलना दरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम अहिवले, पी.एम.बघेले, प्रकाश पंचभाई, कमल बहेकार, के.डी.धनोले, डी.एम.टेंभरे यांचा स्मृती चिन्ह व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर उपक्रमशिल शाळा म्हणून देवरी शाळेच्या मुख्याध्यापिका रजिया बेग यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Educationशिक्षण