शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शासन म्हणते, दिव्यांगांनो ६०० रुपयात भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:05 IST

वाढती महागाई आणि खर्चामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर शासन दिव्यांगाना मागील १५ वर्षांपासून दर महिन्याला सहाशे रुपये मानधन देत आहे.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासून मानधनात वाढ नाही : दिव्यांगानी मांडल्या व्यथा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : वाढती महागाई आणि खर्चामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. तर शासन दिव्यांगाना मागील १५ वर्षांपासून दर महिन्याला सहाशे रुपये मानधन देत आहे. दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करा, अशी आमची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र शासनाने यात वाढ न करता तेवढ्यातच भागवा असे सांगत आहे. सहाशे रुपयात भागावयाचे कसे ते शासनानेच आम्हाला सांगावे, असा सवाल दिव्यांगानी मंगळवारी (दि.१३) लोकमत कार्यालयात आयोजित लोकमत परिचर्चेत उपस्थित केला.जिल्ह्यात २५ हजारावर दिव्यांग आहेत. दिव्यांगाना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अपंग कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्त्वात त्यांचा लढा सुरू आहे.मंगळवारी या संघटनेचे दिनेश पटले, आकाश मेश्राम, श्यामसुंदर बन्सोड, सहेबाज शेख, दुर्गेश जावलकर, रुमन मरस्कोल्हे, संजय घारपिंडे यांनी लोकमत कार्यालयात पोहचून परिचर्चेत त्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच दिव्यांगाना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. यासाठी शासनाने सर्वच विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थाना ३ टक्के निधी राखीव ठेवून तो त्यांच्यासाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र यानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय विभागाकडून तो खर्च केला जात नसल्याचे मेश्राम यांनी सांगितले.संजय गांधी निराधार योजनेतंर्गत दिव्यांगाना दर महिन्याला ६०० रुपये मानधन दिले जाते. मात्र एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती दिव्यांग असल्यास त्या दोघांही मिळून केवळ ९०० रुपये मानधन दिले जाते. हा दिव्यांगावर एकप्रकारचा अन्याय आहे. एकाच कुटुंबातील दोन जण नोकरीवर असल्यास त्या दोघांना स्वतंत्र वेतन न देता एकाचे वेतन दिले तर चालेल का? जो न्याय सरकारी कर्मचाºयांना दिला जातो तोच आम्हाला का लागू नाही. दिव्यांगाचा मुलगा २५ वर्षांचा झाल्यानंतर त्यांचे मानधन बंद केले जाते. मग आम्ही आमच्या वृध्दपकाळात जगायचे कसे, मानधनात वाढ करणे तर दूरच उलट त्यात कपात करुन दिव्यांगाचा सन्मानाने जगण्याचा हक्क सुध्दा शासन हिरावून घेत असल्याचे पटले म्हणाले. दिव्यांगाचा वेगळा विभाग स्थापन करुन यातंर्गत सर्व योजना राबवा, ३ टक्के निधी खर्च न करणाºया विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर कारवाही करा, शासकीय रुग्णालयात दिव्यांगासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करुन आठवड्यातून दोन दिवस प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे. रोजगारासाठी सुलभपणे कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी दिव्यांगानी या वेळी केली.घरकुल योजनेपासून डावललेसर्वच शासकीय योजनांचा लाभ देताना दिव्यांगाना प्राधान्य देण्याची तरतूद आहे. मात्र यानंतरही शासनानेतर्फे राबविल्या जाणाºया घरकुल योजनेचा ३ टक्के लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना दिला जात नाही. पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिव्यांगाना योजनेपासून वंचित ठेवतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाही करण्याची मागणी केली.