शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच स्तरातील व्यक्तींच्या विकासासाठी शासनाच्या योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ५६ आरोग्य केंद्रांत विशेष आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होऊन गावागावांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगीतले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम खमारी येथील वैयक्तिक लाभ योजना शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशातील सर्वच पक्षांच्या सरकारने प्रत्येकच स्तरातील व्यक्तींच्या विकासासाठी योजना लागू केल्या आहेत. शासनाच्या नानाविध योजना आहेत, मात्र नागरिकांना त्यांची माहिती नसल्याने ते लाभापासून वंचित आहेत. या योजना समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम करीत असून याला आता आणखी गती दिली जाणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ५६ आरोग्य केंद्रांत विशेष आयुर्वेदिक चिकित्सकांची नियुक्ती होऊन गावागावांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे प्रयत्न झाल्याचे सांगीतले.शिबिराला पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, विठोबा लिल्हारे, देवेंद्र मानकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, इंद्रायणी धावडे, भास्कर रहांगडाले, रामसिंग परिहार, आशा तावाडे, कैलाश साखरे, विमला तावाडे, राधेश्याम तावाडे, मनोहरसिंह चव्हाण, दुलीचंद मेंढे, मनोहर नागरीकर, महेंद्र बनकर, महेंद्र मेंढे, निळकंठ मेश्राम, निलराज कावडे, राजु बघेले, सचिन मेश्राम, पौर्णिमा रामटेके, निर्मला गोस्वामी यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.विविध योजनांचे २६४ अर्ज प्राप्तया शिबिरात श्रावणबाळ योजनेचे १५०, अटल पेन्शन योजनेचे १०, किसान सन्मान योजनेचे १५, महात्मा जोतीबा फुले आरोग्य योजनेचे ४०, प्रधानमंत्री सुकन्या योजनेचे पाच व आयुष्मान भारत योजनेचे ४४ असे एकूण २६४ अर्ज नागरिकांनी भरून दिले. या अर्जांसोबत लागणारे कागदपत्रही नागरिकांकडून जोडून आता त्यांना मंजूर करण्याची कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल