शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

शासकीय कार्यालयांना गांधीजींचा विसर

By admin | Updated: January 31, 2015 23:23 IST

राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत

देवरी : राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्र.प्र. गोसावी यांनी काढले आहे. मात्र शासकीय कार्यालयांत विपरीत स्थिती दिसून येत आहे. त्याचे असे की, ३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी असून सुद्धा शहरातील ग्रामपंचायत सोडून अन्य सर्व कार्यालयांत पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आलाच नसल्याचे दिसून आले. यातून कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांना शासकीय आदेश व गांधीजींचा विसर पडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कृष्णदास चोपकर व सचिव आचले यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन पुण्यतिथी साजरी केली. एकंदर ग्रामपंचायतने शासकीय आदेशाला मान देत राष्ट्रपित्यांना अभिवादन करून मानवंदना दिली. परंतु शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र शासन आदेशच काय राष्ट्रपित्यांचाही भान राहिला नसल्याचे मुर्त उदाहरण शहरात बघावयास मिळाले. येथील उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, आदिवासी प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो नेहमी प्रमाणे भिंतीवर टांगून होता. कार्यालयात अधिकारी हजर नव्हते. विशेष म्हणजे कार्मचाऱ्यांना विचारणा केली असता महात्मा गांधींची पुण्यतिथी होती याबाबत त्यांनाही माहिती नसल्याचे कळले. सामान्य प्रशासन विभागाने जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरे त्याच दिवशी साजरा करण्याचे आदेश काढले आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावनी व्हावी यासाठी पत्रकाची प्रत राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालतील विभाग प्रमुखांना पाठविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर वर्ष २०१५ मध्ये येणाऱ्या राष्ट्रीय पुरुषांचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक या परिपत्रकासोबत दिले असून सदर कार्यक्रम कोणत्या पद्धतीने साजरे करावेत याबाबतच्या सुचनाही त्यात देण्यात आल्या आहेत. चालू वर्षातील सुमारे २५ कार्यक्रमांची यादी या परिपत्रकासोबत आहे. असे असतानाही अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासकीय आदेश असून सुद्धा शहरातील सरकारी कार्यालयांत महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली नाही ही गंभीर बाब आहे. अशात शासनाच्या आदेशाची पायमल्लीच झाल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)