शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहाचा वीज पुरवठा अखेर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 21:59 IST

मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा मागील १६ दिवसांपासून खंडित होता.

ठळक मुद्देसमस्या लागल्या मार्गी : समाज कल्याण विभाग लागला कामाला

अंकुश गुंडावार । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुर्री येथील अनुसूचित जाती शासकीय वसतिगृहाचा विद्युत पुरवठा मागील १६ दिवसांपासून खंडित होता. लोकमतने यासंबंधीचे वृत्त रविवारच्या अंकात प्रकाशीेत करताच एकच खळबळ उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.१७) वसतिगृहाचा विद्युत पुरवठा पूर्वत सुरू करुन दिला. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहºयावर हास्य फुलले.गोंदिया शहराला लागून असलेल्या मुर्री येथे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृह आहे. आदिवासी दुर्गम भागातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. या वसतिगृहात इयत्ता सहावी ते दहावी चे १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. घरापासून दूर राहून चांगले शिक्षण घेवून काहीतरी बनण्याच्या अपेक्षेने हे विद्यार्थी येथे निवासी राहून शिक्षण घेतात. शार्ट सर्किटमुळे या वसतिगृहाच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावरील विद्युत पुरवठा २ सप्टेंबरपासून खंडित झाला होता. तेव्हापासून विद्यार्थ्यांना अंधारात राहावे लागत होते. लोकमतने या वसतिगृहाला भेट देऊन तेथील समस्यांना वाचा फोडल्यानंतर समाज कल्याण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली. या शासकीय वसतिगृहाच्या देखलभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यामुळे खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात वसतिगृहाच्या गृहपालाने संबंधीत शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांना तीनदा पत्र दिले. मात्र यानंतरही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून अंधारात आणि गरमीमध्ये झोपावे लागत होते.लोकमतने या समस्येचे सविस्तर वृत्त रविवार(दि.१६)च्या अंकात प्रकाशीत केले. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी वसतिगृहाकडे धाव घेत समस्येचा आढावा घेतला. वसतिगृहाच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियत्यांनी सोमवारी वसतिगृहात पोहचत विद्युत पुरवठा सुरळीत करुन दिला. यामुळे गेल्या १६ दिवसांपासून अंधारात असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.विद्यार्थ्यांनी मानले लोकमतचे आभारवसतिगृहातील खंडित विद्युत पुरवठा आणि तेथील समस्यांचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर समाज कल्याण विभागाने त्याची तातडीने दखल घेत त्या मार्गी लावल्या. गेला १६ दिवसांपासून खंडित असलेला विद्युत पुरवठा देखील सुरळीत झाला. लोकमतमुळे आमची समस्या मार्गी लागल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले.सध्या वीजेची तात्पुरती सोयशार्ट सर्कीटमुळे वसतिगृहाच्या दुसºया आणि तिसºया माळ्यावरील वायरींग पूर्णपणे जळाली आहे. वायरींग बदलण्यास दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत तात्पुरती सोय म्हणून थेट वीज पुरवठा घेण्यात आला आहे. लवकरच वायरींग बदलण्यात येणार असल्याचे वसतिगृहाच्या अधिकाºयांनी सांगितले.अधिकारी वसतिगृहातवसतिगृहाच्या खंडित वीज पुरवठ्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशीत होताच समाज कल्याण अधिकारी पवार, समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी (दि.१७) वसतिगृहाला भेट देऊन समस्येचा आढावा घेतला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी देखील याची माहिती घेतल्याचे वसतिगृहाच्या अधिकाºयांनी सांगितले.