गोंदिया : पावसाळयाच्या दिवसात प्रत्येक वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी निर्जतुकीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाते. मात्र काही दिवस याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या शुध्दीकरणाकडे कोणाचेच लक्ष नसते. यामुळे या कालावधीत अनेक प्रकारचे आजार उदभवतात. सध्या तर पावसाळयाचे दिवस सुरू असूनही विहीर व बोअरवेलमधून ग्रामीण भागासह शहरातही अशुध्द पाणी पुरवठा केला जातो.यामुळे रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वातावरणात दररोज बदल घडून येत आहे. यामुळे कधी मोठ्या प्रमाणात उष्ण वातावरणाचा फटका तर कधी पाऊस पडताच थंडावा, या हवामानाच्या बदलामुळे ताप, हिवताप, गॅस्ट्रो अशा विविध प्रकारच्या आजारात वाढ झाली आहे. या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असल्याने खाजगी व शासकीय रुग्णालये गर्दीने हाऊसफुल्ल असल्याचे चित्र सगळीकडेच दिसून येत आहे. ग्रामीण भागात शेतकरी सध्या पेरण्याच्या कामात गुंतला आहे. यामुळे आपले कार्य लवकर पूर्ण कसे करता येईल या उद्देशाने उन्ह-पावसाची तमा न राखता दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतात. यामुळे सर्वसाधारण आजारचे बळी ठरतात. दिवसभराचा उकाडा व उष्णतेनेही कहरच केला असल्याने हा हवामान प्रत्येकालाच मानवणारा नसतो. काही दिवस अचानक पावसाचे आगमन झाले की, हवामानात पूर्णत: बदल होऊन दैनंदिन चक्रच बदलते. यामुळे रुग्णांच्या संख्येत पावसाळा लागताच वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी कधी पाऊस कधी उन्ह असते. यामुळे नविन पाणी विहीरी व तलावात काही प्रमाणात साचले गेले. यामुळे तलावांचे स्त्रोत ज्या विहीरींना आहे. त्या तलावात पावसाच्या पहिल्याच पाण्याने रस्त्यावरील व नाल्यावरील दुुर्गंधी घाण वाहून जाते. हे पाणी ज्या जलस्त्रोताला मिळते ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्या पाण्याचा पिण्यासाठी वापरही केला जात आहे. अनेक प्रकारचे रोग पुढे येतात. यामुळे सुध्दा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. ग्रामीण भागात काही ठिकाणी आरोग्य केंद्र नसल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसते. खाजगी डॉक्टरांच्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसते. खाजगी डॉक्टर ग्रामीण भागात वाजवीपेक्षा जास्त शुल्क रुग्णाकडून वसूल करीत असतात. आजार त्वरीत बरा व्हावा या उद्देशाने वेळेचा विचार न करता रुग्णांना आकारलेली शुल्क द्यावी लागते. यामुळे काही रुग्ण शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतांना दिसतात. कमी दामात आपली चांगली सेवा केली जाईल. या अपेक्षेने शासकीय व रुग्णालयातही रुग्णांची संख् या मोठ्या प्रमाणात दिसते. ऐन पावसाळयात आर्द्रा नक्षत्रातच पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाला आहे. यामुळे ताप, हिवताप, गॅस्ट्रो अशा अनेक प्रकारच्या व्याधींना नागरिकांना घेरलेले आहे. चिंतातूर शेतकऱ्यांची चिंताही आजाराला आमंत्रण देत आहे. पावसाळा लागताच अनेक प्रकारची जीव-जंतू दिसून येतात. त्याच्याही प्रकोपाने आजार संभवतात. खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची तोबा गर्दी दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
हवामान बदलामुळे शासकीय रुग्णालये ‘हाऊसफुल’
By admin | Updated: July 15, 2014 00:03 IST