शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शेती पडीक असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:20 IST

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये रोष : पावसाअभावी ५५ हजार हेक्टर शेतीत रोवणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुुलनेत फार कमी पाऊस झाला. तर ऐन रोवणीच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातीेल अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केलीे नव्हती. परिणामी जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर शेती पडीक राहिली. धानाचे पऱ्हे आणि मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली. मात्र या शेतकºयांना अद्यापही शासनाने कुठली नुकसान भरपाई दिली त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.२०१७ चे खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने नर्सरी टाकून मशागत केलेली सुमारे ५५ हजार हेक्टर शेतीत रोवणीच झाली नाही. यात आमगाव तालुक्यातील चारही महसूल मंडळात २१३७ हेक्टर, सालेकसा तालुक्यातील ३ महसूल मंडळात १ हजार ८६ हेक्टर, गोरेगाव तालुक्यातील ३ महसूल मंडळात १० हजार ८३० हेक्टर, गोंदिया तालुक्यातील ७ महसूल मंडळात १४ हजार ६९२ हेक्टर, देवरी तालुक्यातील ३ महसूल मंडळातील ९ हजार १७२ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यातील ३ महसूल मंडळात २ हजार ८१४ हेक्टर, तिरोडा तालुक्यातील ४ महसूल मंडळातील १२ हजार ३०२ हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ४ महसूल मंडळातील बोंडगावदेवी २४१ हेक्टर अशी सुमारे ५५ हजार हेक्टर शेत जमीन पडीक राहीली.सुरूवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे पºहे टाकले होते. तसेच हवामान विभागाने सुध्दा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला होता. महागडे बियाणेही वापरुन शेतीची मशागत केली होती. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाणाचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. मागील दोन तीन वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाला तोंड देणाºया शेतकऱ्यांना मागीलवर्षी पावसाअभावी शेती पडीक ठेवावी लागल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले.याचा अहवाल सुध्दा कृषी विभागाने शासनाला पाठविला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही शेतकºयांना कुठलीच आर्थिक मदत देण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून हीच का सरकारची शेतकºयांप्रती संवेदनशिलता असा सवाल उपस्थित केला जात आहे.पीक विम्याच्या लाभापासून वंचितपावसाअभावी रोवणी न करणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक काढला होता. मात्र त्याचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला नाही.केवळ तिरोडा तालुक्यातील वडेगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. तर उर्वरित ३० महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्याला याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पीक विम्याच्या हप्त्याचा भुर्दंड शेतकºयांना बसला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती