शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:54 IST

भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले.

ठळक मुद्देनाना पटोले : तालुकास्तरीय बुथ समन्वयक मेळावा व सत्कार समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ अजूनपर्यंत झालेले नाही. भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्ह्यात निबंधकांना विचारण्यात आले तेव्हा अजुनपर्यंत कर्जमाफीची पूर्ण यादी आलेली नसल्याचे ते सांगतात. महागाई वाढली असून शेतमालाच्या किमती घसरलेल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.येथील श्रीमती अंजनाबाई झरारीया सभागृहात आयोजित तालुकास्तरीय बुथ समन्वयक मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव पी.जी. कटरे, प्रदेश प्रतिनिधी अमर वऱ्हाडे, अ‍ॅड. के.आर. शेंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे, सखी मंच संयोजिका ममता दुबे, मातृसेवा संघटनेच्या अध्यक्ष वनिता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना पटोले यांनी, १५ दिवसानंतर आणखी एक मोठा कार्यक्रम घेण्यात येईल. तेथे मात्र जनसमुदाय मोठा असेल. आता कामाला लागा, अन्यथा नवीन भर्ती करावी लागेल. कागदावर काम नको प्रत्यक्ष काम पाहिजे असेही सांगितले. या कार्यक्रमात माजी खासदार पटोले यांचा आयोजक, व मातृसेवा संघाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित अन्य पदाधिकाºयांनीही या वेळी मार्गदर्शन केले.संचालन माणिक झंझाड यांनी केले. आभार माजी पं.स. सदस्य पटले यांनी मानले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पटले यांनी मांडले. कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, हुपराज जमईवार, कमल कापसे, धनराज पटले, रामलाल रहांगडाले, दिलीप ढाले, छाया मडावी, रुबुना मोतीवाला, ओमप्रकाश पटले यांनी े सहकार्य केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले