शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सरकार आरक्षण देण्याचे गाजर देत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:47 IST

केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला मागील चार वर्षांत ठोस असे काहीच करता आले नाही. या सरकारने जनतेला केवळ पोकळ आश्वासने देवून दिशाभूल करण्याचेच काम केले. आता सरकार धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे गाजर देत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

ठळक मुद्देअजित पवार : तिरोडा येथे प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा: केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला मागील चार वर्षांत ठोस असे काहीच करता आले नाही. या सरकारने जनतेला केवळ पोकळ आश्वासने देवून दिशाभूल करण्याचेच काम केले. आता सरकार धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे गाजर देत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा येथे गुरुवारी (दि.२४) प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी आ. दिलीप बंसोड, राजेंद्र जैन, रमेश पारधी, माजी मंत्री अनिल देशमुख, विनोद हरिणखेडे, राधेलाल पटले, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे, उमेंद्र भेलावे, गणेश बरडे, निता रहांगडाले, माजी नरेश माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, किशोर गजभिये उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, या सरकारने शत्रू राष्ट्र असलेल्या पाकीस्तानकडून साखर आयात केली. आपला शेतकरी इकडे ऊस पिकवितो व पाकिस्तानातून हे सरकार साखर आयात करुन त्यांचे हाथ बळकट करीत आहे. नोटबंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. अच्छे दिन आनेवाले है? ते कुठे गेले गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे का आले नाही. कर्नाटकात सर्व विरोधक एकत्र आलेत तर उत्तरप्रदेशात मायावती व अखिलेश यादव एकत्र आले. आता या शासनाचे काही खरे नाही. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शौचालयाचा वापर करा, बांधकाम करा, पण पाणीच नाही तर त्याचा उपयोग काय? असा टोला त्यांनी लगावला. गडकरी साहेबांनी मागील सभेत बारा हजार कोटी रुपयांचे रस्ते बांधणार असे सांगितले. हे खरच होणार आहे का? बोलाचीच कडी व बोलाचेच भात आहे. यात लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही, असेही सांगितले. तुरीला देशात भाव नाही व सरकार परदेशातून तूर आयात करीत आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.