शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाने झेडपीचा ११ कोटींचा निधी वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:25 IST

जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसदस्यांची उच्च न्यायालयात धाव : पालकमंत्र्याकडे निधी वर्ग करण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेला लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या कामांचा निधी वाटप करण्याचे अधिकार शासनाच्या ६ आॅक्टोबरच्या जीआर नुसार आता पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहे. शासनाने जिल्हा परिषदेच्या अधिकारात कपात करुन त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. याच निर्णयाचा फटका झेडपीच्या ११ कोटी रुपयांचा निधी बसला आहे. जि.प.ला हा निधी ६ आॅक्टोबरच्या पूर्वी प्राप्त झाला असल्याने तो खर्च करण्याचा अधिकार सुध्दा जि.प.ला असल्याचा ठराव घेण्यात आला आहे.गोंदिया जि.प.लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ च्या कामासाठी ११ कोटी ४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. या लेखाशिर्षातंर्गत प्राप्त निधीतंर्गत कामांना मंजुरी देण्याचे अधिकार आत्तापर्यंत जिल्हा परिषदेला होते. तर हा निधीसुध्दा जि.प.कडे ६ आॅक्टोबरपूर्वीच वर्ग करण्यात आला. मात्र शासनाने ६ आॅक्टोबरला काढलेल्या जीआरनुसार या दोन्ही लेखाशिर्षा अंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्याचे अधिकार आता पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे.त्यामुळे जि.प.ला प्राप्त झालेला ११ कोटी ४ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या मुद्दावरुन जि.प.च्या सर्वसाधरण सभेत सुध्दा वादंग निर्माण झाला होता. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे यांनी जिल्हा परिषदेला हा निधी शासन निर्णयापूर्वी वर्ग करण्यात आला आहे.त्यामुळे या निधी अंतर्गत कामे वाटपाचा अधिकार हा जि.प.चा आहे. यानंतरही शासनाने जबरदस्ती केल्यास तसा ठराव घेवून उच्च न्यायालयात दाद मागण्याची मागणी केली. त्याला सभागृहाने सुध्दा मंजुरी दिली होती. तसेच जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांनी ही कामे जिल्हा परिषदेला करण्याचे अधिकार देण्यात यावे.यासंदर्भात ठराव घेवून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे या दोन्ही विकास कामात खंड निर्माण होणार आहे. दरम्यान याविरुध्द एका जि.प.सदस्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.शासनाने १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीना देत जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी केले. त्यानंतर आता लेखाशिर्ष ३०/५४ आणि ५०/५४ च्या कामे वाटपाचे जि.प.चे अधिकार कमी केले आहे. यामुळे हळूहळू जि.प.चे महत्त्व कमी करण्याचा डाव शासनाचा आहे. हा चुकीचा प्रकार असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करु.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य.

टॅग्स :zpजिल्हा परिषद