शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

गोंदियात सुरू होणार शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:46 IST

शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देआमदार अग्रवाल यांचे प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी यावर मंजुरी देत या संदर्भात आवश्यक अहवाल व प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तंत्र शिक्षण विभागाला दिले आहे.इंजिनीयरींग कॉलेजच्या विषयाला घेऊन आमदार अग्रवाल यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत आमदार अग्रवाल यांनी, जिल्ह्यातील खासगी इंजिनीयरींग कॉलेज तोट्यात असल्यामुळे संचालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगीतले. तसेच जिल्ह्यात १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. सोबतच कित्येक खासगी व शासकीय पॉलीटेक्नीक व आयटीआयमधील शेकडो विद्यार्थी पुढे इंजिनीयरींगमध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक असतात. मात्र येथील एकमात्र इंजिनीयरींग कॉलेज बंद झाल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या असून भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले असून त्याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगीतले.शिवाय गोंदिया जिल्हा गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांना लागलेला असून आजघडीला या तिन्ही जिल्ह्यांत एकही शासकीय इंजिनीयरींग कॉलेज नाही. अशात गोंदियात शासकीय इंजिनीयरींग कॉलेज सुरू झाल्यास त्याचा पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना नक्कीच लाभ मिळणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना चर्चेत सांगीतले. तसेच आपल्या मागणीला घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली मंजुरी दर्शवित यासाठी आवश्यक तसा अहवाल व प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश तंत्र शिक्षण विभागाला दिले असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले.टी.बी. हॉस्पिटलची जागा सूचविलीजिल्ह्यात शासकीय इंजिनीयरींग कॉलेजची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना समजावून सांगीतल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी कॉलेजसाठी शहरातील टी.बी.हॉस्पीटलची जागा सुचविली. सुमारे १७-१८ एकर जागा सध्या अनुपयोगी पडली असून इंजिनीयरींग कॉलेजसाठी एक आदर्श स्थान होऊ शकते असेही आमदार अग्रवाल यांनी सुचविले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीGopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल