शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार शेतकºयांची फसवणूक करीत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:05 IST

सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे.

ठळक मुद्देविजय शिवणकर : दुष्काळ घोषित करण्याचा एकमताने ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची फसवणूक करीत आहे. कधी नोटबंदी, पीक विमा अशा उपक्रमातून सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम करित आहे. सरकार जनतेचे कामे करित नसेल तर अशा सरकारला धडा शिकविण्याची जबाबदारी राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विजय शिवणकर यांनी केले.ग्राम बनगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्टÑवादी काँग़्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, कृउबासचे माजी सभापती टिकाराम मेंढे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कविता रहांगडाले, माजी जि.प. सदस्य उषा हर्षे, महिला महासचिव संगीता दोनोडे, पं.स.सदस्य प्रमोद शिवणकर, सिंधू भूते, तिरथ येटरे, महासचिव लक्ष्मी येळे, निखील पशिने, सरपंच संगीता ब्राम्हणकर, सुधा शहारे, सुनीता रहांगडाले, संगीता भांडारकर, बाबूलाल दोनोडे, प्राचार्य कमलबापू बहेकार, रविंद्र मेश्राम, विनोद कुन्नमूवार, बेनीश्वर कटरे, सिताराम फुंडे, सुरेंद्र कोटांगले, मुक्तानंद पटले, कल्पना बावनथडे, पुष्पा चौधरी, विनोद बोरकर, जनार्धन शिंगाडे, संजय मुनेश्वर, रवी क्षीरसागर, टुंडीलाल कटरे, दिनदयाल चौरागडे, तुलेंद्र कटरे, रमन डेकाटे उपस्थित होते.याप्रसंगी हर्षे यांनी, सत्ता परिवर्तन कराल तरच सामान्यांचे दिवस येतील. केवळ राष्टÑवादीचे कार्यकर्ते हे राष्टÑीय कार्यकर्ते आहेत. त्यांनी निवडणुकीपुरते मर्यादित न राहता समाज कार्यात भाग घ्यावा असे आवाहन केले. चंद्रीकापुरे यांनी, महराष्टÑातच नव्हे तर संपूर्ण देशात शेतकºयांचे खच्चीकरण केले जात आहे. पिक विमाच्या फक्त देखावा व कागांवा करण्यात आला. त्याचे फलस्वरुप शेतकºयांना मिळाले नाही आणि मिळणार देखील नाही. सरकार व रिलायंन्सने फसवेगिरी केली आहे. आॅफलाईन अर्ज आजही जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्याचे काय, सरकारने उत्तर दयावे असे मत व्यक्त केले.यावेळी ग्राम पंचायत निवडणूक, बेरोजगाराचे प्रश्न, शेतकºयांचे प्रश्न, दुष्काळ, कृषीमालाला रास्त भाव मिळावा तसेच सरकार धोरणाविरोधात आंदोलनाची चर्चा करण्यात आली. तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार यांनी दुष्काळ घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला तो पारित करण्यात आला. संचालन महासचिव देवेंद्र मच्छिरके यांनी केले. आभार कमल बहेकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी विजय रगडे, राजू फुंडे, मेघश्याम मेंढे, लक्ष्मण हत्तीमारे, भरत येटरे, राहूल रगडे, प्रकाश फुंडे, विजय भांडारकर, संजय रावत, पुरुषोत्तम चुटे, संतोष श्रीखंडे, विजय मुनेश्वर, प्रशांत गायधने आदिंनी सहकार्य केले.

भाजप-सेना कार्यकर्त्यांचा प्रवेशया सभेत ग्राम करंजी येथील परसराम लांजेवार, जितेंद्र लांजेवार, संतोष लांजेवार, राजेश लांजेवार, राजाराम लांजेवार, शालीकराम लांजेवार सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप व शिवसेनेतून राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षाची तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.