शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील पाणीपुरवठा योजनेची वाट मोकळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:36 IST

गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनगर पंचायतचे मजिप्राला पत्र : लवकरच एस्टीमेट बनविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव शहराकरिता नव्या पाणी पुरवठा योजनेची वाट मोकळी झाल्याची दिसत आहे. नगर पंचायतच्या स्थापने नंतरच या दिशेने प्रयत्न केले जात होते. मात्र आता नगर पंचायतकडून या संदर्भात एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला देण्यात आले आहे.गोरेगावला लागून अगोदरचीच एक पाणी पुरवठा योजना सुरू आहे. या योजनेतून गोरेगाव त्याला लागून असलेल्या चार गावांना संयुक्तरित्या पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र ही जुनी व जर्जर झाली आहे. यामुळे नव्या योजनेसाठी कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. त्यात गोरेगावला नगर पंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना अधीक जोर दिला जात होता.यासाठी नगर पंचायतकडून प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला देणे बंधनकारक होते. त्यानुसार गोरेगाव नगर पंचायतने नुकतेच दोन-तीन दिवसांपूर्वी एक पत्र महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला दिले आहे.त्यानंतर आता एक-दोन दिवसांत महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून एक पत्र तयार करून गोरेगाव नगर पंचायतला दिले जाणार आहे. या पत्रात नगर पंचायतकडून एक रक्कम टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही रक्कम टाकल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अधिकाऱ्यांकडन सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाणार आहे. हे सर्वेक्षण झाल्यानंतर कामाचे एस्टीमेट तयार करून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे एक प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतरच योजनेच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे. आता नवीन पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला कधी मंजुरी मिळते यावर सर्व काही अवलंबून आहे. मात्र योजनेची वाट मोकळी झाल्याने योजना येणार हे स्पष्ट झाले आहे.काय आहे नवीन पाणीपुरवठा योजनेतजुन्या व सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेत तीन टाक्या बनलेल्या आहेत. या तीन टाक्यांना नवीन योजनेतही कामी आणले जाईल. याशिवाय एक नवी टाकी तयार केली जाईल. नव्या योजनेत गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत येणाºया नवीन वसाहत ज्या जुन्या योजनेत समाविष्ट नाहीत त्यांना जोडले जाईल. याशिवाय पुर्ण पाईप लाईन नव्याने टाकली जाणार. जल शुद्धीकरण केंद्र क्वचीतच स्थापित केले जाईल. जुनी योजना चार गावांसाठी होती, मात्र नवीन योजना फक्त नगर पंचायत अंतर्गत येणाºया गावांसाठी राहणार आहे.नुकतेच पत्र मिळाले आहे. नवीन पाणी पुरवठा योजना तयार केली जाणार असून तसे प्रयत्न सुरू आहेत. गोरेगाववासीयांनी शुद्ध पाणी पुरवठा व्हावा हेच आमचे प्रयत्न आहे.-रोशनी धमगाये , अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Waterपाणी