शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

गोरेगाव तालुक्यात गावरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 21, 2014 01:47 IST

तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

गोरेगाव : तालुक्यातील ९९ गावांमधील रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. मात्र तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींकडे अतिक्रमण हटाव समित्याच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात ग्रामविकास खात्याचा स्वतंत्र आदेश आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला या आदेशाचा विसर पडला आहे. गावातील खुल्या किंवा शासकीय जागेवर गावकऱ्यांनी अतिक्रमण करू नये यावर नजर ठेवण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला ‘अतिक्रमण हटाव समिती’ गठित करण्याचे आदेश दिले आहे. पण सदर आदेशाची ग्रामपंचायत प्रशासनाने दखल न घेतल्याने गावातील मुख्य रस्ते, जोडरस्ते, शासकीय जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहेत. ग्रामविकास खात्याच्या स्वतंत्र विभागाने प्रत्येक गावात ग्रामसभेत अतिक्रमण हटाव समिती स्थापन करण्याचे आदेश सर्व पंचायत समितीतर्फे ग्रामपंचायतींना दिले होते. या समितीमध्ये सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचा समावेश करण्याचे आदेशात म्हटले होते. गावात ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना प्रथम सूचना करणे, नोटीस बजावणे, त्यानंतरही अतिक्रमण न काढल्यास पोलीस ठाण्याला माहिती देवून तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेशात नमूद आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अतिक्रमण करणारे शिरजोर झाले आहेत. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला तेथील नागरिक जुमानत नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या अधिनस्थ ९९ गावे येतात. या गावातील रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. चारचाकी वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकांनी रस्त्यालगत काटेरी कुंपन केल्याने अनेकांचे अपघात झाले आहे. हा सर्व अतिक्रमणाचा प्रकार राजरोष सुरू असून याविरोधात आवाज उचलणारे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य ‘व्होटबँक’ कमी होईल या भितीने शांत आहेत. या गावागावातील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर वेळीच कारवाई झाली नाही तर भविष्यात रस्ताच शोधण्याची वेळ प्रशासनाला येईल. भविष्याचा विचार करून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी सुज्ज्ञ नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)