शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

‘गुडमॉर्निंग’ पथक वर्षभरात झाले ‘गुडनाईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:12 IST

गावागावातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. मात्र पथकाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने अवघ्या एका वर्षातच ‘गुडनाईट’ व्हावे लागले आहे. जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आलेला मोहिमेनंतर गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागल्याने ही मोहीम गुंडाळण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावर : नागरिकांचे उदासीन धोरण

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गावागावातील नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. मात्र पथकाला अनेक ठिकाणी विरोध होत असल्याने अवघ्या एका वर्षातच ‘गुडनाईट’ व्हावे लागले आहे. जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आलेला मोहिमेनंतर गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊ लागल्याने ही मोहीम गुंडाळण्यात आली आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेला मोहिमेतून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. पण त्या शौचालयांचा वापर न करता गावकरी उघड्यावर शौच करीत असल्यामुळे त्यांना थांबविण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर ‘गुडमॉर्निंग’ पथकांचे गठन केले होते. या ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अभियान यशस्वी होईल असे वाटत असतांनाच गावकºयांनी ‘गुडमार्निंग’ पथकाला जोरकस विरोध करीत त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत ‘गूडमॉर्निंग’ पथकातील अधिकारी, कर्मचारी व गावकरी पथकासह गावच्या वेशीवर जाऊन उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत होते. काही तालुक्यांमध्ये शौचास जाणाºयाला गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याची गांधीगिरी देखील करण्यात आली. ग्रामस्थांच्या चांगला सवयीसाठी स्थापन झालेल्या या पथकाला मात्र विरोध झाला आणि अनेक आरोपही लागल्याने ही मोहीम थांबल्याचे चित्र आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावागावात स्वच्छता नांदावी, उघड्यावरील शौचास आळा बसावा या उद्देशातून ‘गूडमॉर्निंग’ पथकाची निर्मिती करण्यात आली होती. पण या पथकाला लोकसहभाग न मिळाल्यामुळे हे अभियान एकाच वर्षात गुंडाळण्यात आले.‘गुडमॉर्निंग’ पथकावरच कारवाईउघड्यावर जाणीवपूर्वक प्रात:विधी करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५ व कलम ११७ मधील दंडात्मक तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत होती. गावातील उपद्रवी नागरिकांवर आळा बसावा गावागावात स्वच्छता टिकावी हा यामागचा उद्देश होता. मात्र ‘गूडमॉर्निंंग’ पथकाने उघड्यावर प्रात:विधी करणाऱ्या नागरिकांचे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे बºयाच तालुक्यात ‘गूडमॉर्निंंग’ पथकालाच कारवाईला पुढे जावे लागले.अनेकांकडे शौचालयच नाहीगावागावात अनेकांकडे शौचालय नसल्याचे वास्तव चित्र आहे. निर्मल ग्राम योजनेंतर्गत १२०० रुपयांत शौचालयाचे बांधकाम करण्यासंदर्भात शासनाने अनुदान दिले होते. त्या १२०० रुपयांत अनेकांनी शौचालयाचे बांधकाम केले. पण सुविधा नसल्यामुळे त्या शौचालयांचा वापर होऊ शकला नाही, पुढे प्रशासनाने शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान दिले. पण प्रथम १२०० रुपयांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याना पुढे लाभ देता येणार नाही. शासनाच्या या अटी-शर्तींमुळे स्वच्छ भारत मिशन फक्त कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.शौचालय आणि पाणी समस्यागावागावात तयार करण्यात अलेले सार्वजनिक शौचालय व त्याजवळील पाण्याची उपलब्धता याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे शौचालयांचा वापर करणे नागरिकांनी टाळले. शौचालयातील घाण, तुटलेले दार यामुळे शौचालयांचा वापर करावा कसा या प्रमुख समस्या नागरिकांना उघड्यावर प्रात: विधी करण्यास बाध्य करीत होत्या.