शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! गणेश मंडळांना मिळणार घरगुती दराने वीज; महावितरणकडून विशेष भेट

By कपिल केकत | Updated: September 1, 2023 18:49 IST

अवैधरित्या वीजजोडणी करणे टाळा

गोंदिया : जेमतेम काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून, त्यादृष्टीने गणेश मंडळांची तयारी सुरू झाली आहे. यात गणेश मंडळांकडून वीज चोरीचे प्रकार घडू नयेत, यासाठी महावितरणकडून गणेश मंडळांना घरगुती दरात वीज दिली जाणार आहे. यामुळे मंडळांनी महावितरणकडे संपर्क साधून नियमानुसार वीजजोडणी घेऊन सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करावा, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

येत्या १९ तारखेला ला़डक्या गणरायाचे आगमन होत असून, त्यासाठी गणेश मंडळांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. आपल्या मंडळाचा सर्वात वेगळा देखावा व रोषणाई असावी, यासाठी सर्वांचेच प्रयत्न असतात. मात्र, असे करताना कित्येकांकडून काही पैसे वाचविण्यासाठी अवैधरित्या वीज जोडणी घेतली जाते. हा प्रकार धोकादायक असून, यातूनच कित्येकदा अपघात घडतात व अनर्थ होतो. विशेष म्हणजे, कित्येकदा हा प्रकार अंगलट येत असून, कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत.

नेमकी हीच बाब हेरून महावितरणकडून लाडक्या गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून गणेश मंडळांना घरगुती दराने वीज दिली जाणार आहे. जेणेकरून मंडळांकडून अवैधरित्या वीजजोडणी घेतली जाऊ नये व काही अप्रिय घटना घडू नये. यासाठी गणेश मंडळांनी महावितरण अभियंत्यांशी संपर्क साधावा, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

लागणार ही कागदपत्रंगणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी घेण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, वीज निरीक्षकांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीज संच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयीकृत बॅंक खाते पासबुकची छायांकीत प्रत आदी कागदपत्र लागणार आहेत.

गणेश मंडळांनी अशी घ्यावी काळजी

  • गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकराचे वीज अपघात होऊ नयेत, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब वीज वाहिन्या, रोहित्र आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे.
  • मंडपातील वीज संच मांडणी करताना वीज सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • मंडपातील वीज संच मांडणी मान्यताप्राप्त वीज कंत्राटदारांकडून करून घ्यावी.
  • गणेश मंडळांनी वीज सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडतोड करू नये. आपत्कालीन परिस्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावे.
टॅग्स :mahavitaranमहावितरणGaneshotsavगणेशोत्सव