शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण ...

ठळक मुद्देचार दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्यानंतर पाणी टंचाईची संभाव्य स्थिती ओळखून जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वेळीच उपाय योजना केली नाही. परिणामी मागील चार दिवसांपासून शहराला होणार पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. तर गोंदियात प्रथमच पाणी बाणीची स्थिती निर्माण झाली आहे.गोंदिया शहराची लोकसंख्या दोन लाखांवर असून शहराला डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची आहे. प्रती व्यक्ती १३५ लिटर याप्रमाणे मजीप्रा ग्राहकांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा करते. मात्र जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले कोरडे पडले आहेत. तसेच भूजल पातळीत सुध्दा घट झाली आहे. तर यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. त्यामुळे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. तर गेल्या चार पाच दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठाच केल्या जात नसल्याने पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. काही भागातील नळाला पाच मिनिटे पाणी येऊन ते बंद होत असल्याने दैनदिन वापरासाठी दूरवरुन पाणी आणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. शहरातील अनेक भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत तर सार्वजनिक विहिरींमधील गाळांचा उपसा न केल्याने त्यांनी देखील तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील काही मोजक्या विहिरी आणि बोअरवेलवर महिलांची पाण्यासाठी गर्दी असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मागील २० ते २५ वर्षांत प्रथमच शहरवासीयांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून याला जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग जबाबदार असल्याची ओरड शहरवासीयांची आहे.उपाययोजनेकडे दुर्लक्षभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हा प्रशासन आणि मजीप्रा यांना दिलेल्या अहवालानुसार यंदा शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने या दोन्ही विभागाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र वेळ पडल्यास पुजारीटोला धरणाचे पाणी आणून शहरवासीयांची तहान भागवू असे घसा कोरडा पडेपर्यंत या दोन्ही विभागाच्या अधिनस्त अधिकाºयांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वेळीच कुठलीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

टॅग्स :Waterपाणी