शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

गोंदियात ६२.७२ तर तिरोड्यात ७३.१५ टक्के

By admin | Updated: January 9, 2017 00:43 IST

नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी गोंदिया व तिरोड्यात शांततेत मतदान पार पडले.

मतदानाची टक्केवारी घसरली : नगर परिषद निवडणुकीसाठी शांततेत पार पडले मतदान गोंदिया : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी गोंदिया व तिरोड्यात शांततेत मतदान पार पडले. गोंदियात अपेक्षेच्या तुलनेत बरेच कमी म्हणजे अवघे ६२.७२ टक्के मतदान झाले, तर तिरोड्यात ७३.१५ टक्के मतदान झाल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह नगरसेवकपदाच्या उमेदवारांची राजकीय भविष्य मतदान यंत्रणात लॉक झाले. सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत बहुतांश निकाल जाहीर होतील.नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अशोक इंगळे, काँग्रेसचे राकेश ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता यांच्यात प्रमुख लढत आहे. त्यातच बहुजन समाज पार्टीचे पंकज यादव किती मते घेतात आणि कोणाचे गणित बिघडवतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. रविवारी गोंदियात १४३ मतदान केंद्रांवरून मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी काही वेळ मतदानाचा उत्साह दिसून आला. त्यानंतर दुपारपर्यंत मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. सायंकाळी ४ नंतर मात्र पुन्हा गर्दी वाढू लागली. काही केंद्रांवर तर सायंकाळी ५.३० वाजता मोठी रांग असल्यामुळे त्या सर्वांना केंद्राच्या आवारात घेऊन फाटक बंद करण्यात आले. नंतर त्यांचे मतदान सायंकाळी ७ पर्यंत सुरू होते. मागील २० दिवसा नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच जोर पकडला होता. गोंदियात मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार हिंगे, मेश्राम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एकूण ५७२ कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गोंदिया शहरातील ३ प्रभाग अतिसंवेदनशील तर ४ प्रभाग संवेदनशील असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने त्या केंद्रावर पोलिसांची करडीनजर होती. गोंदिया शहराच्या १४ प्रभागांसाठी १४३ मतदार केंद्र तर रामनगरच्या सात प्रभागासाठी ४७ मतदान केंद्र, तर तिरोड्याच्या तीन प्रभागासाठी १६ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. परंतु पोलीसांनी प्रभाग क्र. १, १२ व १३ ला अतिसंवेदनशील ठरविले आहे. त्या प्रभागात मरारटोली, नप शाळा, रामनगर हिंदी शाळा, रामनगर म्युनिसिपल शाळा, सूर्याटोला संत गाडगेबाबा शाळेत असलेले केंद्र अतिसंवेदनशील आहेत. संवेदनशील केंद्रामध्ये ५, ९, १०, ११ या प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागातील सर्वच केंद्रावर करडी नजर होती. गोंदिया शहरात शांततेच्या मार्गाने नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक गटामागे एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व २५ कर्मचारी असा चोख बंदोबस्त लावला होता. सोमवारी मतमोजणीसाठी पोलीस तैनात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) आज मतमोजणी ४सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजतापासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्यात प्रभाग क्रमांक १ ते ११ पर्यंत ११ टेबलवरून मतमोजणी होणार आहे. ४दुसऱ्या टप्यात प्रभाग क्रमांक १२ ते २१ पर्यंतची मतमोजणी होणार आहे. सोबतच नगराध्यक्षपदासाठीची मतमोजणी सुरू राहणार असून त्याचा निकाल मात्र सर्वात शेवटी घोषित केला जाणार आहे.त्यामुळे निकालाची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहणार आहे.