शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया फेस्टीव्हलनिमित्त चित्रकला व छायाचित्र स्पर्धा

By admin | Updated: February 7, 2017 00:53 IST

जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोंदिया : जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने गोंदिया फेस्टीवलचे औचित्य साधून येत्या १२ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सुभाष गार्डन येथे गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण घरांच्या छायाचित्रांची स्पर्धा आयोजित केली असून त्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका आमंत्रित करण्यात आल्या आहेत.गोंडी आदिवासी समाजाची विशिष्ट अशी चित्रकला आहे. या चित्रकलेचा प्रचार-प्रसार व्हावा, नवोदित चित्रकारांना सुध्दा ती अवगत व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबर रोजी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट येथे गोंडी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन केले होते. चित्रकला विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य इच्छुक चित्रकारांसाठी या गोंडी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी व शिक्षकांनी सर्व साहित्य सोबत आणायचे आहे. समितीमार्फत चित्र काढण्यासाठी ड्रॉर्इंग शिट पुरविण्यात येणार असल्याचे आयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले.घरांची छायाचित्र स्पर्धा नैसर्गिक संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील घरे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उतरती छपरे, त्यावर गोल कवेलू, छपरांना चारही बाजूंनी दिलेला उतार व तीन टप्प्यात विभागलेले छप्पर आणि तीन विभागात विभागलेली घरे हे जिल्ह्यातील घरांचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागात सर्वत्र सुंदर, मातीनी सारवलेली, त्यापुढे बांधलेले बैल, धानाचे पुंजणे आणि अंगणात खेळणारी मुले हे दृष्य फार नयनरम्य असून ते जिल्हाभरात सर्वत्र पहायला मिळते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी जिल्ह्यातील संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी तसेच वाढत्या शहरीकरणामुळे दुर्मिळ होत असलेल्या ग्रामीण घरांचे वैभव छायाचित्राच्या रुपाने जतन करु न ठेवण्यासाठी या घरांच्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि स्वस्त दुकानदार यांना फोटो काढण्याचे विशेष आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले आहे. हे फोटो १० फेब्रुवारीपर्यंत पाठवावे, असे जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.