शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात आठ तोतया शिक्षकांनी उचलले २५ लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाºयांच्या मदतीने जिल्हा मध्यवर्ती बॅकेतून कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाºया त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाºयांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात ...

ठळक मुद्देकंपनीच्या कर्मचाऱ्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखलजिल्ह्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बजाज फिनसव्हर्स कंपनीच्या एका कर्मचाºयांच्या मदतीने जिल्हा मध्यवर्ती बॅकेतून कर्जाची उचल करण्यासाठी आठ जणांनी स्वत:ला शिक्षक दाखवून त्यासाठी खोटे पगार पत्रक तयार केले. या खोट्या पगार पत्रकाच्या आधारे २५ लाख २९ हजारांची उचल करणाºया त्या तोतया आठ शिक्षकांसह बजाज कंपनीच्या कर्मचाºयांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोंदिया येथील चांदणी चौकातील सारासार कॉम्प्लेक्स पोद्दार स्टीलजवळ दुसºया माळ्यावर बजाज फिनसव्हर्स कंपनीचे आॅफिस आहे. येथे उमेश जांभूळकर नावाच्या व्यक्तीने आठ लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी त्यांना तोतया शिक्षक बनविले. यासाठी त्याने खोटे पगारपत्रक, ओळखपत्र व कागदपत्रे तयार केली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१७ या दरम्यान हा प्रकार घडला. गोंदियातील ललीत बलीराम अगाडे, राजेश सेवकराम राऊत, मनोज पोलीराम डोंगरे, लोकेश प्रभाकर ढोमणे, बबीता प्यारेलाल सोनवाने, भरतलाल चैनलाल पारधी, प्रशांतकुमार बिसेन कोचे, शिवलाल सूजरलाल मंडीये या आठ लोकांना आरोपी उमेश जांभूळकर यांनी शिक्षक असल्याचे दाखविले. त्यांचे खोटे पगार पत्रक तयार करुन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खोटे स्टेटमेंट व शाळेचे खोटे ओळखपत्र दाखवून बजाज फिनसव्हर्स कंपनीकडून २५ लाख २९ हजार रुपये रकमेच्या कर्जाची उचल केली. दरम्यान उचल केलेल्या कर्जाच्या रक्कमेचा आकडा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात राकेश विठ्ठलराव बनकर (३२) यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यतातोतया शिक्षकांच्या नावावर बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय उचल केलेल्या कर्जाचा आकडा २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यातील मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.हप्ते थकल्याने फुटले बिंगज्या तोतया शिक्षकांनी बजाज फिनसव्हर्स कंपनीतून कर्जाची उचल केली. मात्र त्यानंतर त्यांनी उचल केलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले नाही. कर्जाची उचल केल्यापासूनच हप्ते थकल्याने कंपनीच्या कर्मचाºयांनी रिकव्हरीसाठी सदर तोतया शिक्षकांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तेव्हा या नावाचे कुणीही शिक्षक नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी