शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

दुर्दम्य आत्मविश्वासाला गोंदियाकरांचा सलाम

By admin | Updated: March 2, 2015 01:39 IST

आदिवासी समाजात असलेला अशिक्षितपणा, त्यातच त्यांचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, अशात त्यांचा उपचार करून विकासाच्या मार्गावर पाऊल टाकण्यात स्वत:चा देह झिजविणाऱ्या ...

गोंदिया : आदिवासी समाजात असलेला अशिक्षितपणा, त्यातच त्यांचे आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष, अशात त्यांचा उपचार करून विकासाच्या मार्गावर पाऊल टाकण्यात स्वत:चा देह झिजविणाऱ्या डॉ. प्र्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पाहताना गोंदियातील पे्रक्षकांनी अक्षरश: अश्रूला वाट मोकळी करून दिली. पत्नीची साथ व दुर्दम्य आत्मविश्वासाच्या भरवशावर साता समुद्रापार कीर्ती मिळविणाऱ्या डॉ. आमटे दाम्पत्याला गोंदियाकरांनी सलाम केला. निमित्त होते लोकमत युवा नेक्स्ट व आकृती थिंक टुडे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२८) प्रभात चित्रपटगृहात दाखविण्यात आलेल्या ‘प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाच्या विशेष शो चे. या चित्रपटातून गोंदियाकरांना डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी मंदा आमटे व त्यांच्या कार्यांची ओळख झाली.स्वत:साठी आज सगळेच जगत आहेत. आपली पत्नी, आपली मुलं एवढेच त्यांचे जग उरले आहे. मात्र या संकुचित विचारसरणीवर मात करीत अर्धांगिनीला सोबत घेत उपेक्षित आदिवासींचे जीवन फुलविणाऱ्या आमटे दाम्पत्याच्या खडतर जीवनातून बरेच काही शिकण्याजोगे आहे. त्यांच्या जीवनाची ही वास्तविकता, त्यांचा संघर्ष व परिस्थितीवर मात करून त्यातून गवसलेले यश हे सर्वसामान्यांनाही माहिती व्हावे आणि त्यातून प्रेरणा घेता यावी या उद्देशातून गोंदियाकरांसाठी लोकमत युवा नेक्स्ट व आकृती थिंड टुडे बहुउद्देशिय संस्थेने या चित्रपटाचा एक शो नि:शुल्क दाखविला. राष्ट्रगीताने या चित्रपटाची सुरूवात करण्यात आली.येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव दोडके, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ, सावजी शिक्षण संस्थेचे संस्थापक सुरेश चौरागडे, डॉ.धनश्याम तुरकर, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर, प्रा.सविता बेदरकर, शिक्षक समिती सचिव एल.यु. खोब्रागडे, पुरूषोत्तम मोदी आदींनी उपस्थित राहून दाद दिली. त्यांचे स्वागत लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, आकृती थिंक टुडे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुडधे यांनी केले.या विशेष शोच्या आयोजनासाठी लोकमत बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार, जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू, प्रा.बबन मेश्राम, प्रा.एच.पी. पारधी, दर्पण वानखेडे, लकी भोयर, पारस लोणारे, वर्षा भांडारकर, विजय ठाकरे, कुशल अग्रवाल आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)अन् विद्यार्थीही झाले गंभीरतिकिटविना सिनेमा पाहायला मिळत असल्याने काही विद्यार्थी फक्त टाईमपास म्हणून एकत्रितपणे चित्रपट पाहायला आले होते. त्यामुळे सिनेमा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या बऱ्याच पैकी हालचाली व गमती-जमती सुरू होत्या. मात्र चित्रपट सुरू होऊन पुढे जात होता तसतसे हे विद्यार्थी गंभीर होत चालल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काहींनी तर अश्रूंना वाट मोकळी करून देत आपले गांभीर्य व्यक्त करून दिले. या शाळा-महाविद्यालयांचा सहभागया चित्रपटासाठी येथील नमाद महाविद्यालय, मनोहरभाई फार्मसी महाविद्यालय, जानकीदेवी चौरागडे महाविद्यालय, गुरूनानक महाविद्यालय, डी.बी. सायन्स महाविद्यालय, मारवाडी महाविद्यालय, जीपीजी महाविद्यालय, महषी विद्यालय, मनोहर म्युनिसिपल शाळा यासह अन्य शाळेतील विद्यार्थ्यासह त्यांचे प्राचार्य व शिक्षकगण उपस्थित होतेनि:स्वार्थ समाजसेवेचा परिचयगडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावातील आदिवासींची विदारक परिस्थिती या चित्रपटात विषद करण्यात आली आहे. डॉ.प्रकाश व डॉ.मंदा आमटे यांनी केलेले विलक्षण सामाजिक कार्य या चित्रपटातून दाखविण्यात आले. नि:स्वार्थ समाजसेवा कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव हा चित्रपट बघण्यासाठी एकत्र आलेल्या गोंदियाकरांनी अनुभवला. मान्यवरही भारावून गेलेविलक्षण अनुभव देणारा चित्रपटखरी समाजसेवा या चित्रपटातून दिसून येते. बाबा आमटे माझ्या गावचेच. हा चित्रपट विस्मयकारी व चमत्कारिक अनुभव देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसेवा कशी असते याचे जिवंत चित्रण करण्यात आले. निर्मात्या अ‍ॅड.समृद्धी कोरे यांनी स्वत:चे पैसे पदरमोड करून ही कलाकृती समाजास अर्पण केली. तेथील आदिवासी माडिया भाषा वेगळी आहे. परंतु सर्वांना समजावा अशा भाषेत हा चित्रपट आहे. - डॉ.संजीव दोडके वैद्यकीय अधीक्षक, बीजीडब्ल्यु रूग्णालय. दिशाहिनांना दिशा मिळेल नवीन पिढीला समाजसेवेची दिशा दाखविणारा हा चित्रपट लोकमत युवा नेक्स्ट व आकृती संस्थेने बघण्यासाठी उपलब्ध करून दिला. हे खरंच युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.- किशोर धुमाळ निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा

प्रत्येक शाळा व महाविद्यालयांत दाखवावेलोकमततर्फे दाखविण्यात आलेला हा चित्रपट नवीन पिढीला प्रेरणा देणारा आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांत दाखवायला हवा. जेणेकरून विद्यार्थ्यांना डॉ.प्रकाश आमटे यांच्या कार्यांची माहिती होईल व विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची प्रेरणा या चित्रपटातून मिळू शकेल.- सुरेश चौरागडे संस्थापक, जानकीदेवी चौरागडे शिक्षण संस्थासर्वांनीच प्रेरणा घ्यावी डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य प्रेरणादायक आहे. सर्वांनीच त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्यापरीने जमेल ते इतरांसाठी व समाजासाठी करण्याची गरज असल्याचे चित्रपटात दाखविले आहे.- डॉ.धनश्याम तुरकरजिल्हा उपाध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसिएशन.