शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यांवर गोंदियाकर करतात दररोज २ लाख रुपयांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

शासकीय रुग्णालयात दररोज १८००, तर १० खासगी प्रयोगशाळांमध्ये ३०० चाचण्या केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट करण्यासाठी कुठलेच शुल्क लागत नसून, खासगी रुग्णालयात चाचण्यांसाठी ५०० ते ७५० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. 

ठळक मुद्देसंसर्ग वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढविले : खासगी प्रयोगशाळेत दररोज ३०० चाचण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली असून, दरराेज दीडशे कोरोना बाधितांची नोंद होत आहे. संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाणसुध्दा वाढविण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात दररोज १८००, तर १० खासगी प्रयोगशाळांमध्ये ३०० चाचण्या केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट करण्यासाठी कुठलेच शुल्क लागत नसून, खासगी रुग्णालयात चाचण्यांसाठी ५०० ते ७५० रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. गोंदिया शहरातील १० खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचण्या करण्याची परवानगी आरोग्य विभागाने दिली आहे. यानुसार या प्रयोगशाळांमध्ये दररोज ३०० चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांसाठी गोंदियाकरांना दररोज २ लाख १० हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. बरेच नागरिक शासकीय रुग्णालयात न जाता खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन कोरोना चाचणी करतात. त्यामुळे यासाठी त्यांना शुल्क भरावे लागते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असल्याचे खासगी प्रयोगशाळा संचालकांनी सांगितले.  

  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात दररोज १८०० आणि खासगी प्रयोगशाळेत ३०० चाचण्या केल्या जात आहेत. मागील आठवडाभरात एकूण १६,८०० चाचण्या करण्यात आल्या. 

 कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागाने टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. त्यामुळे चाचण्या वाढविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.  खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांची माहिती वेळीच आरोग्य विभागाला पोहोचवली जात नसल्याने उपाययोजना करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आहे.

५०० ते ७५० कोरोना चाचणीसाठी रुपयांचा खर्च 

 शासनाने नुकतेच आरटीपीसीआर चाचण्यासाठी ५०० रुपये आणि अँटिजेन टेस्टसाठी १५० रुपयांचे दर निश्चित करुन दिले आहेत. मात्र, बऱ्याच खासगी प्रयोगशाळांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ७५० रुपये घेतले जात असल्याची माहिती आहे.  खासगी प्रयोगशाळांकडून कोरोना चाचण्यांसाठी शासकीय दरापेक्षा अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीसुध्दा आहेत. पण, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या