शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात शारदा विसर्जनासाठी गेलेला बुडाला तरुण तलावात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:45 IST

शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर  गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश राजेश उके (वय १९वर्ष) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

गोंदिया : शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर  गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकुश राजेश उके (वय १९वर्ष) असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान रात्री अंधारामुळे शोध मोहीम राबवता आली नाही. त्यामुळे बुधवारी(४ ऑक्टोबर) सकाळी ७ वाजल्यापासून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

गोविंदपूर मार्गावरील एका सार्वजनिक शारदा उत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शारदादेवीचे विसर्जन मंगळवारी रात्री छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावात करण्यात आले. अंकुशसुद्धा त्याच्या मित्रांसह शारदा विसर्जनाकरिता या तलावावर गेला होता. दरम्यान अंकुश आणि त्याचा मित्र तलावात उतरले. मात्र काही वेळानंतर त्याचा मित्र बाहेर आला. पण अंकुश बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रानं तलाव परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे त्याने याची माहिती अंकुशच्या कुटुंबीयांना दिली.

अंकुशच्या वडिलांनी रात्रीच शहर पोलीस ठाणे गाठून याची माहिती शहर पोलिसांनी दिली. रात्री फार उशीर झाल्याने तलावात शोध मोहीम राबविता आली नाही. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुधवारी (4 ऑक्टोबर) सकाळी ७ वाजल्यापासून शोध मोहीम राबविण्यात आली. या घटनेची माहिती शहरात पसरताच शहरवासीयांनी छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावाजवळ गर्दी केली होती. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी काही नगरसेवकांसह तलावावर पोहोचत परिसराची पाहणी केली. तरुणाच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. दरम्यान बुधवारी (4 ऑक्टोबर) दुपारी 1 वाजेपर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध लागला नव्हता. दहा दिवसांचा शारदा उत्सव गोंदिया जिल्ह्यात नवरात्रीच्या पाच दिवसानंतर शारदादेवीची स्थापना केली जाते. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. हा उत्सव देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंगळवारपासून शारदा विसर्जनाला सुरूवात झाली आहे.