शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:56 IST

पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे.

ठळक मुद्दे१० वर्षांपासून योजना बंद मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश

मोहन भोयर ।आॅनलाईन लोकमततुमसर : पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्ट जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करून त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होणार की भंगारात जमा होणार असा प्रश्न पडला आहे.सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी तीन कोटी रूपये खर्च करुन दहा गावाकरिता ही योजना महाराष्टजीवन प्राधीकरणने पूर्ण केली. सन २००३-०४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. देव्हाडी, ढोरवाडा, चारगाव, हिंगणा, हसारा, खापा, परसवाडा (दे), तुडका, तामसवाडी आदी गावाकरिता ही योजना आहे. योजना पुर्णत्वास आल्यानंतर १० वर्षांपासून बंद आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर ती चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही योजना बंद स्थितीत होती. या योजनेत लाभ घेणाऱ्या गावांनी शिखर परिषद तयार करून पाणीपट्टी वसूली करून ही योजना चालविण्याचा अधिकार संबंधित गावांना देण्यात आला, परंतु आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशी या योजनेची स्थिती असल्याने येथे कुणीही तसा प्रयत्न केला नाही. सर्वच अपवाद वगळता ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.या योजनेची पाईपलाईन गळती, नविन पाईपलाईन घालणे, लिकेज दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे येथे करण्याची गरज आहे.सन २०१४-२०१५ मध्ये तशी कामे करण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजनेत ३१ डिसेंबर २०१६ मध्ये समावेश करण्यात आला. तसे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा स्तरावर पाणीपूरवठा योजनेचे स्वतंत्र कार्यालय असून अभियंते व इतर कर्मचारी आहेत.यासंदर्भात संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्यानंतर पाणी पुरवठा केव्हा केला जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भात आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी निवेदन देऊन ही योजना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.पाणी पुरवठा योजनेला शासनाने प्राधान्यक्रम देऊन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे नाव या योजनेला दिले आहे. निदान पेयजल योजना तरी शासनाने मार्गी लावावी.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडी

मुख्यमंत्री पेयजल योजनेत देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा समावेश होऊन एक वर्ष लोटत आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. आ. परिणय फुके यांनी भेटून पाठपुरावा करणार आहे.- राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा (दे.)

टॅग्स :Waterपाणी