शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गोंदिया-तिरुपती विमानसेवा सहा दिवसांपासून ठप्पच; कमी दृश्यतेचा परिणाम

By अंकुश गुंडावार | Updated: December 29, 2023 20:34 IST

आयएलएस यंत्रणा लागल्यास निघेल मार्ग

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन सुरु झालेली गोंदिया-तिरुपती विमानसेवा खराब वातावरण आणि कमी दृश्यतेअभावी शुक्रवारी (दि.२९) सलग सहाव्या दिवशी रद्द होती. यामुळे गोंदियाहून तिरुपती आणि हैद्राबादला जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

इंडिगो विमान कंपनीने गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या प्रवासी विमान वाहतूक सेवेला १ डिसेंबरपासून सुरुवात केली. जवळपास २१ दिवस ही सेवा सुरळीतपणे सुरु होती. पण मागील सहा दिवसांपासून खराब वातावरण व कमी दृश्यतेअभावी ही विमानसेवा ठप्प पडली आहे. डीजीसीएने ५ हजार मीटर दृश्यतेशिवाय टेकऑप आणि लॅडिंग करण्यास मनाई केली आहे. तर सध्या तीन ते साडेतीन हजार मीटर दृश्यता असल्याने विमानतळावर विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तिरुपतीहून गोंदियाला येणारे येथे उतरु शकले नाही आणि गोंदियाहून तिरुपती जाणाऱ्या विमानाचे उड्डाण सुध्दा झाले नाही.

शुक्रवारी सुध्दा हीच समस्या कायम होती. त्यामुळे गोंदियासह लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता आला नाही. तर अनेक प्रवाशांना आधी बुक केलेले तिकिट रद्द करावे लागले. त्यामुळे त्यांना त्यांचा नियोजित कार्यक्रम सुध्दा रद्द करावा लागला. जेव्हापर्यंत दृश्यतेची अडचण दूर होणार नाही तेव्हापर्यंत ही सेवा पुर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयएलएस लागल्यानंतर दूर हाेईल अडचण

कमी दृश्यता असताना देखील विमानतळावरुन टेकऑफ आणि लॅडिंग करण्यासाठी इन्स्ट्रूमेंट लॅडिंग सिस्टम (आयएलएस) ही यंत्रणा मदतपुर्ण ठरते. बिरसी विमानतळ प्राधिकरणाने ही यंत्रणा रशिया येथून मागविली असून ती दोन महिन्यापासून येथे पडून आहे. पण यंत्रणा अद्यापही कार्यान्वित केली नाही. बिरसी विमानतळाच्या परिसरातून गेलेला परसवाडा-कामठा हा मार्ग बंद केल्यानंतरच ही यंत्रणा लावण्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे बिरसी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जर आयएलएस ही यंत्रणा लवकर कार्यान्वित झाली तर ही अडचण कायमची दूर होवू शकते.

टॅग्स :airplaneविमान