शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर; तापमान ४३.५ अंशावर, नवतपानंतर जास्त ताप

By कपिल केकत | Updated: June 3, 2023 19:54 IST

२५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला.

गोंदिया : २५ मे पासून सुरू झालेला नवतपा शुक्रवारी (दि.२) संपला असून यंदा नवतपाने जिल्हावासीयांना चांगलाच ताप दिला. मात्र नवतपा संपल्यानंतर जिल्हा अधिक तापत असल्याचे शनिवारी (दि.३) आले. कारण, शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर पोहोचले होते व जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता. जून महिना लागला असून तापमान वाढत चालले असल्याने जिल्हावासीयांचा जीव कासावीस होत आहे. आता त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून फक्त पावसाची वाट पाहत आहेत.

यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे दोन महिने पाहिजे तसा उन्हाळा तापला नाही. एप्रिल महिन्यातील मोजकेच दिवस तापमान वाढले होते व बहुतांश महिना पावसातच गेला होता. परिणामी सूर्यदेव जिल्ह्यावर तापू शकले नाहीत. मात्र मे महिना लागताच अवकाळी पावसाने जिल्ह्यातून पाय काढला व सूर्याने आपला हिशेब बरोबर केला. अवघ्या मे महिन्यात चांगलेच ऊन तापल्याने मार्च व एप्रिल महिन्यातील कसरही निघून गेली. विशेष म्हणजे, तापमान ४१-४१ अंशांच्या घरात असले तरीही उकाड्याने नागरिकांचे जास्त हाल झाले.

त्यात नवतपानेही चांगलेच भाजून काढले असतानाच शनिवारी (दि.२) नवतपा संपूनही तापमान उलट वाढताना दिसत आहे. शनिवारी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशावर होते. विशेष म्हणजे, सर्वाधिक तापमान अमरावतीचे ४३.६ अंशांवर असल्याने गोंदिया जिल्हा विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर होता.

२० एप्रिल रोजी होते ४३.५ अंश तापमान- जिल्ह्याचे तापमान यंदा सातत्याने ४१-४२ अंशांतच नोंदले गेले आहे. मात्र उकाड्यामुळे जिल्हावासीयांना जास्त त्रास सहन करावा लागला आहे. अशात शनिवारी (दि.३) जिल्ह्याचे तापमान दुसऱ्यांदा ४३.५ अंशावर पोहोचले व ते सर्वाधिक असल्याचे दिसले. यापूर्वी २० एप्रिल रोजी जिल्ह्याचे तापमान ४३.५ अंशांवर गेले होते व तेव्हाही जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता.

हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज नाहीचजून महिना लागला असून तीन दिवस लोटले आहेत. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत जिल्ह्यात पावसाचे काहीच चिन्ह दिसत नाही. उलट लगतच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. तर जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळ्याने काही पाठ सोडलेली नाही. त्यात हवामान खात्याकडूनही पावसाचा काहीच अंदाज वर्तविण्यात आलेला नाही.

विदर्भातील प्रथम पाच क्रमांकावरील जिल्हेजिल्हा- तापमान

  1. अमरावती- ४३.६
  2. गोंदिया- ४३.५
  3. वर्धा व अकोला- ४३.४
  4. चंद्रपूर- ४३.२
  5. ब्रह्मपुरी- ४२.८ 
टॅग्स :gondiya-acगोंदिया