शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया पोलिसांची नक्षल दमन विरोधी सप्ताहात जनजागृती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

गोंदिया : माओवादी संघटनेतर्फे २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पाळण्यात येणाऱ्या ‘नक्षल शहीद सप्ताहाला’ प्रत्युत्तर म्हणून गोंदिया जिल्हा ...

गोंदिया : माओवादी संघटनेतर्फे २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पाळण्यात येणाऱ्या ‘नक्षल शहीद सप्ताहाला’ प्रत्युत्तर म्हणून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता नक्षल विचारसरणीच्या विरोधात प्रशासनाला सहकार्य करण्याचे उद्देशाने, पोलीस-जनता संबंध अधिक दृढ व्हावी, पोलीस प्रशासनाबाबत आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन व त्याअंतर्गत येणाऱ्या सशस्त्र दूरक्षेत्रांतर्गत नक्षल दमन विरोधी सप्ताह २१ जुलैपासून सुरू करण्यात आला आहे. नक्षल दमन विरोधी सप्ताहादरम्यान वृक्षारोपण, नक्षलग्रस्त भागातील शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळाविषयी मार्गदर्शन केले. दुर्गम भागात नक्षलविरोधी पोस्टर लावून नक्षलविरोधी प्रोपगंडा करून नक्षलवाद्यांचा निषेध करण्यात आला. ग्रामभेटीदरम्यान नक्षल विचारसरणीला बळी न पडण्याचे दृष्टीने तसेच नक्षल गावबंदी योजना राबविण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. नक्षल हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार व सामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. विविध उपक्रम कार्यक्रम राबवून नक्षलग्रस्त भागात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात आले. या सप्ताहात नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नक्षलग्रस्त भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता, शासकीय योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावे, शासनाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कळविले आहे.