शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात गोंदिया पोलीस भारीच राव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, घरफोडी, मारामारी व घातपात असे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गोंदिया पोलीस कमालीची कसरत करीत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदियाची कारवाई सामान्य आहे. परंतु गडचिरोली रेंजमधील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदिया गुन्हे उघडकीस आणण्यात आघाडीवर आहे. ७६ टक्के गुन्हे गोंदिया पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलिसांचे कामकाज सुसह्य होण्यासाठी विकसित केलेल्या सीसीटीएनएस (क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) या प्रणालीमध्ये गोंदिया पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत गोंदियाने गडचिरोलीला मागे टाकले आहे. डिसेंबर महिन्यात गोंदिया जिल्हाभरात ८२६ गुन्हे दाखल करण्यात आले. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोरी, घरफोडी, मारामारी व घातपात असे विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गोंदिया पोलीस कमालीची कसरत करीत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदियाची कारवाई सामान्य आहे. परंतु गडचिरोली रेंजमधील गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची तुलना केल्यास गोंदिया गुन्हे उघडकीस आणण्यात आघाडीवर आहे. ७६ टक्के गुन्हे गोंदिया पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?- सीसीटीएनएस प्रणालीत देशभरातील सर्व ठाण्यांत दाखल होणारे गुन्हे, तपास व तत्सम अभिलेख्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. - ऑनलाइन तक्रारींचा निपटारा, दाखल गुन्हे, तपास, दोषारोपपत्र अशी एकूण १८ प्रकारची माहिती सीसीटीएनएसमध्ये अपलोड करावी लागते. - प्रत्येक महिन्याला या कामकाजाचे राज्यात गुन्हे अन्वेषण विभागामार्फत मूल्यांकन केले जाते.- मूल्यांकनानुसार कोणत्या जिल्ह्याने किती गुण घेतले याचा एक रिपोर्ट तयार केला जातो.

गुणांकनात १७२ पैकी १३०  गुण

डिसेंबर २०२१ मध्ये सीसीटीएनएस प्रणालीत गोंदिया जिल्हा पोलीस दलाने १७२ पैकी १३० गुण घेऊन आपली कामगिरी बऱ्यापैकी आहे असा संदेश दिला.गोंदियापेक्षा गडिचरोली १० गुण कमी घेऊन गोंदियाच्या मागे राहिला आहे. गडचिरोलीला १२० गुण मिळाले आहेत.

वर्षभरात हजारो गुन्ह्यांची ऑनलाईन नोंद

- गोंदिया जिल्ह्यातील सर्व गुन्ह्याची ऑनलाईन नोंदणी केली जाते. जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांत दाखल होणाऱ्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने एफआयआर केली जाते. जिल्ह्यातील  हजारो तक्रारी वर्षभरात नोंदविण्यात आल्या आहेत.

सायबर सेलची मिळते चांगली मदत- सीसीटीएनएसच्या नोंदीसोबत ऑनलाइन तक्रारींचा निपटारा, गुन्हे तपास व प्रतिबंध यासाठी अधिकाधिक काम केले. नियमित आढावा घेतला. सीसीटीएनएसच्या अंमलदारांनीही परिश्रम घेतले. कोणत्याही तपासात सायबर सेलची चांगली मदत मिळते.

 

टॅग्स :Policeपोलिस