शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Gondia: गहाळ झालेले ८८ मोबाईल शोधून पोलिसांनी दिले तक्रारकर्त्यांना, पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मोबाईल धारकास वाटप  

By नरेश रहिले | Updated: June 17, 2023 18:29 IST

Gondia: हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या.

- नरेश रहिले  गोंदिया: हातात जग सामावून घेणारी वस्तू म्हणजे मोबाईल. परंतु अत्यावश्यक झालेले मोबाईल कुठे हरविले तर त्यात मन गुरफडून जाते. मोबाईल हरविल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. परिणामी गोंदिया शहर पोलिसांनी ते गहाळ झालेले मोबाईल विविध ठिकाणातून शोधून मूळ मालकाला दिले. गोंदिया शहर ठाण्याच्या हद्दीतून पळविण्यात आलेले ८० मोबाईल हे तक्रारकर्त्याला परत करण्यात आले.

सन २०२१ पासून २०२३ या तीन वर्षात गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईल संदर्भात तक्रार गोंदिया शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी तांत्रीक मदतीने तपास कररून विविध कंपन्यांचे ८८ मोबाईल अत्यंत महागडे शोधून ते तक्रारकर्त्यांना परत करण्यात आले. १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात तक्रारकर्त्यांना बोलावून पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजने, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी ते मोबाईल तक्रारकर्त्यांना परत केले.

हे मोबाईल शोधण्यासाठी गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, अरविंद राऊत, विजय गराड, रामभाऊ होंडे, पोलीस उपनिरीक्षक शरद शैदाने, सहाय्यक फौजदार जागेश्वर उईके, घनश्याम थेर, महिला पोलीस हवालदार रिना चव्हाण, पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, कवलपालसिंह भाटीया, संतोष भांडारकर, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, दीपक रहांगडाले, पुरूषोत्तम देशमुख, विक्की पराते, करण बारेवार, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, सायबरसेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीद, पोलीस हवालदार दिक्षीत दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, घनश्याम शेंडे, संजय महारवाडे यांनी मोहीम राबविली होती. गोंदिया जिल्हाभरातील तरूण-तरूणींचे मोबाईल गोंदिया शहरातून पळवून नेले होते.

टॅग्स :MobileमोबाइलPoliceपोलिस