शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील पहिला कोरानाबाधित रुग्ण झाला बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 21:04 IST

जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळला होता. दरम्यान १७ दिवसानंतर शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

ठळक मुद्देआता होम क्वारंटाईन ठेवणारजिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळला होता. यानंतर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली होती. सदर रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. दरम्यान १७ दिवसानंतर शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.गोंदिया जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण २६ मार्च रोजी गोंदिया येथे आढळला होता. सदर रुग्ण हा बँकांक येथून गोंदिया येथे परतल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली होती. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय व मित्रांना सुध्दा येथील कुडवा परिसरातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट या आधीच कोरोना निगेटीव्ह आले होते. सदर रुग्णावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होता. सदर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्या पहिल्याच दिवसापासून उपचाराला प्रतिसाद देत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रुग्णांचे उपचारादरम्यान दोनदा स्वॅब नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (दि.१०) त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या वेळी सदर रुग्णाचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेविका आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर सदर रुग्णाला १४ दिवस घरीच होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.जिल्हा झाला कोरोनामुक्तजिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया येथे आढळल्यानंतर संपूर्ण जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सदर रुग्ण आता पूर्णपणे बरा झाल्याने शुक्रवारी रात्री त्याला रूग्णालयातून सुटी देण्यात आली. देण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा कोरोना मुक्त झाला असून जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णावर मागील १७ दिवसांपासून उपचार सुरू होते. त्याने पहिल्याच दिवसापासून उपचाराला प्रतिसाद दिला. उपचारा दरम्यान तीनदा त्याचे स्वॅब नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शुक्रवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.- व्ही.पी.रुखमोडे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या