गोंदिया : गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच वर्षी सुरू केले जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर ना.तावडे यांनी उत्तर देताना जून २०१६ पासून मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे आश्वासन दिले.यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात आ.गोपालदास अग्रवाल यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम व इतर काही आमदारांनी या विषयावर चर्चा केली. आ.अग्रवाल यांनी लक्षवेधीतून सरकारचे लक्ष वेधताना सांगितले की, ३ जानेवारी २०१३ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने गोंदिया व चंद्रपूरसाठी प्रत्येकी १०० प्रवेशक्षमता असलेले मेडिकल कॉलेज सुरू करण्यास मंजुरी दिली होती. त्यासाठी ७५ टक्के रक्कम (१४२ कोटी) तत्कालीन केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते. (जिल्हा प्रतिनिधी)
गोंदिया मेडिकल कॉलेज याच वर्षी
By admin | Updated: April 2, 2016 02:13 IST